गतिमाम पाणलोट, लाखो रुपये पाण्यात

0
6

आमगाव : कोरडवाहू शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून शासननाने लाखो रुपये खर्च करुन बंधारे बांधले. मात्र,  तयार झालेले बंधाऱ्यांचे आयुष्य एकदोन वर्षाच्या वर राहत नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. परिणामी, लाखो मिळूनही शेतकरी कंगालच आणि अधिकारी मात्र मालामाल होत असल्याचे चित्र आहे.

कृषी विभागांतर्गत गतिमान पाणलोट कार्यक्रमांतर्गत नाल्यावर बंधारे तयार केले जातात. मात्र, या विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्याचे आयुष्य एकदोन वर्षापेक्षा जास्त्यात राहत नसल्याच्या तक्रारी आहेत.यावरून गतिमान पाणलोट कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी विकासाची गती मंदावत चालल्याचे चित्र आहे.