शेतकऱ्यांचे धान खरेदीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

0
17

गोंदिया,दि.16 : शासकीय आधारभुत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2022-23 मधील धान खरेदीकरीता शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत 31 जानेवारी 2023 रोजी संपलेली आहे. चालू हंगामात शासनाने खरीप हंगामासाठी धान खरेदीची मुदतवाढ दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत दिलेली आहे. करीता नोंदणी झालेल्या उर्वरीत सर्व शेतकऱ्यांनी 28 फेब्रुवारी पर्यंत आपल्या तालुक्यातील जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन धान विक्री पूर्ण करुन घ्यावी. धान विक्रीसाठी देऊन शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. असे जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी कळविले आहे.