डॉटस् उपचार पद्धतीने क्षयरोग बरा – दिलीप गावडे

0
26

गोंदिया,दि.२९ : क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होते अशा व्यक्ती क्षयरोगाने ग्रासल्या जातात. क्षयरुग्णांना शासनातर्फे देण्यात येणारा औषधोपचार डॉटस् (डायरेक्टली ऑब्झव्हर्ड ट्रीटमेंट विथ शॉर्ट कोर्स किमोथेरपी) देणे रोगमुक्तीसाठी सोयीस्कर झाले आहे. डॉटस् उपचार पद्धती म्हणजे क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम आहे आणि औषधोपचार पुर्ण कालावधीपर्यंत घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी केले.
नुकताच जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात क्षयरोग जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, उदघाटक म्हणून जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.समाज कल्याण समिती सभापती श्री.वडगाये, जि.प.कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, जि.प.महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपूरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिष कळमकर यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्ह्यातील एमडीआर क्षयरोगमुक्त झालेल्या रुग्णांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. त्याचबरोबर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. क्षयरोग जनजागृती मोहिमेकरीता पॉम्पलेटसचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. क्षयरुग्णांना शोधण्याकरीता मान्यवरांच्या उपस्थित शपथ घेण्यात आली. सर्वजण मिळून टीबी संपवूया हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.आर.पी.गहलोत, डॉ.डी.एस.भुमकर, सी.बी.भुजाडे, प्रज्ञा कांबळे, हरिश चिंधालोरे, अमित मंडल, डी.सी.डोंगरवार, पंकज लुतडे, श्रीमती नगरारे, श्री.गजभिये, श्री.अग्रवाल, विलास राठोड, डी.बी.चौधरी, श्री.सिंग, एन.एन.लोणारे, राजु मेश्राम, भोजेंद्र बोपचे, श्री.भाजीपाले, रिजवाना शेख, संजय रेवतकर, रामचंद लिल्हारे, संजय भगवतकर, मंजुश्री मेश्राम, अशोक मुडपीलवार, लक्ष्मी उज्जैनवार, श्री.तांबे, श्री.मधुमटके व लता कांबळे यांनी परिश्रम घेतले. संचालन पवन वासनिक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ.विशाल काळे यांनी मानले.