शिवरायांचे आचार-विचार आचरणात आणणे हीच खरी शिवजयंती-माजी खा.शिशुपाल पटले

0
10

स्पर्धेत भाग घेणाऱ्या विजेत्यांना बक्षीस वितरण

तुमसर-* हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठाण तुमसर च्या वतीने श्यामसुंदर सेलिब्रेशन हॉल ,विनोबा नगर,तुमसर येथे आयोजित करण्यात आली होती. शिवजन्मोत्सव निमित्त दि.१७-१८ व १९ फेब्रुवारीला तिन दिवस सुरू असलेल्या शिवस्फूर्ती माहामॅराथॉन,सांस्कृतिक कार्यक्रम, माहाआरोग्य शिबीर,रक्तदान शिबिर,रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,गडकिल्ले बनवा स्पर्धा, मशाल रॅली व भव्य शोभायात्रा असे अनेक आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी खासदार मधुभाऊ कुकडे होते,तर उद्घाटन माजी खासदार शिशुपालजी पटले यांचे शुभ हस्ते झाले.शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुमसर नगरीला शिवमय करण्यात आले होते.यावेळी शिशुपाल पटले यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श पुढे ठेऊन त्याप्रमाणे प्रत्येकाने कृती करणे,त्यांचे आचार विचार आचरणात आणने,प्रत्येक मातेने आपल्या मुलाना सद्विचार,सु-संस्कार देतांना शिवछत्रपतींचा दाखला द्यावा तेंव्हाच खरी शिवजयंती होईल असे प्रतिपादन आपल्या उदघाटन पर मार्गदर्शनातून केले. संस्थेच्या माध्यमातून शहरात अनेक उपक्रम राबविण्यात आली.त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन धांडे,अमोल उमरकर व त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य दिलीपजी सार्वे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनीलजी लांजेवार,माजी सरपंच गळीरामजी बांडेबूचे,सामाजिक कार्यकर्त्या सौ.मिराताई भट्ट,माजी पोलीस पाटील सुखदेवजी रहांगडाले,सुशील मेश्राम उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान चे अध्यक्ष नितीन धांडे, अमोल उमरकर व त्यांचे शेकळो कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.