मुंडीपार येथे सामाजिक कार्यकर्ते सोनु शेंडेच्या वतीने पाणपोईची व्यवस्था

0
18

गोरेगाव,दि.01:-उन्हाळयात माणसाची तहान भागवण्यासाठी पाणपोई होत्या.आता पाणपोईची संख्या कमी झाल्याने,लोकं पाऊच,पाणी बाटल विकत घेऊन आपली तहान भागवतात.पण अनेक ठिकाणी कामानिमीत्त येणारे,जाणारे ग्रामीण वर्गातील गरजु लोकांना पाणी विकत घेणे परवडणारे नसते.त्यामुळे अशा गरजुंची तहान भागविण्याच्या उद्देशाने मुंडीपार बसस्टॉप याठिकाणी फ़िल्टर पाण्याची (ब्यारल)पाणपोई सामाजिक कार्यकर्ते सोनु शेंडे यांच्या वतीने आज 1 मार्च रोजी सुरू करण्यात आली. पाणपोईचे उद्घाटन तंटामुक्ती अध्यक्ष गिरिश पारधी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव नेवारे,घनश्याम बिसेन, उमेंद्र ठाकूर,रोहित पांडे,भरतलाल बिसेन,अरुण पारधी,डॉ.सुजय मजुमदार,धनराज नेवारे,नडिलेश राऊत,श्रीचंद गमधरे,कांतीलाल बिंझलेकर आदी उपस्थित होते.