देवरी ओबीसी सेवा संघ व कृती समितीच्यावतीने तहसिलदारांना निवेदन

0
7

देवरी,दि.1-राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारला सामाजिक न्याय भवन परिसरात ओबीसींच्या न्याय मागण्यासाठी गेलेल्या ओबीसी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चचेर्नंतरच्या घोषणाबाजीनंतर ओबीसी समाजाप्रती काढलेल्या अपशब्दाचा निषेध नोंदविण्यासाठी देवरी तालुका ओबीसी सेवा संघ व ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने निषेध नोंदविणारा निवेदन राज्यपाल व  मुख्यमंत्री याच्या नावे तहसिलदार नागटिळक यांना देण्यात आले.यावेळी सेवा संघाचे अध्यक्ष सुदर्शन लांडेकर, सुनिल वाघमारे,कबिर जांभुळकर,आकाश रगांरी,भुमेश्वर रहागंडाले,घनश्याम फरकुंड़े,विक्रम वंजारी,राकेश तलमले,मुनेश काळे,उत्कर्ष लांडेकर,मधुकर गावंडे,बाळकृष्ण बहेकार,विजय डहाके,राजेश भुते,सेवकराम कटरे,मगेश चौबे,सुशांत थोटे,रंजित लेडे,पुरुषोत्तम रहिले,योगेश्वर लोंढे आदी उपस्थित होते.