ओबीसी सेवा संघाने दिले सामाजिक न्यायमंत्र्याच्या विरोधात निवेदन

0
14

आमगाव,दि.01- गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना सोमवारला देण्यात आलेल्या निवेदनाच्यावेळी चर्चेनंतर पालकमंत्री हाय हाय नान क्रिमिलेयरचे झाले काय अशी घोषणा देताच सामाजिक न्यायमंत्री बडोले यांंी सर्वांसमोर ओबीसींच्या अंगात आली काय अशा पध्दतीने समाजाचा अपमान करणारे शब्द वापरल्याच्या निषेधाथर् ओबीसी सेवा संघ गोंदिया जिल्हा शाखेच्यावतीने आज आमगावचे तहसिलदार राजीव शक्करवार यांनाम राज्यपाल व मुख्यमंत्र्याच्या नावे असलेले निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन देतेवेळी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बी.एम.करमकर,डी.यू.बिसेन,के.ए.हुकरे,व्ही.ए.येडेवार,भ.जी.येडे,ड.बी.येडे ,दिप ब्राम्हणकर,सावन कटरे आदी उपस्थित होते.