तुमसरे यांच्या नेतृत्वात सामाजिक न्यायमंत्र्याविरोधात नारेबाजी

0
7

भंडारा- मनुवादि विचारधारा असलेल्या संघटनेच्या विळख्यात मा. सामाजीक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्यावर पगडा आलेला असून भारतरत्न बाबासाहेबांच्या विचारधारेलाच तडा देऊन ओबीसी समाजाला अपमानास्पद  शब्द वापरुन अपमान केल्याबद्दल अजय तुमसरे यांनी 30/03/2016 ला येथील त्रीमुर्ती चौकातील महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून सामाजिक न्याय मंत्री शासन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला.तसेच त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.यावेळी भंडारा शहर पोलिसांनी अजय तुमसरे व त्यांच्या सहकारी मित्रांना ताब्यात घेतले.