भाजपच्या नियमबाह्य कामांवर बंदी घाला

0
8

गोंदिया :  नगर परिषदेतील भारतीय जनता पक्षाच्या प्रशासनाकडून नियमबाह्य ठराव घेऊन शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितांच्या विरूद्ध तसेच नगर परिषदेला हानीकारक ठरणार्‍या नियमबाह्य कामांवर बंदी घालण्याची मागणी शहर कॉंग्रेस कमिटीने केली आहे. यासाठी कमिटीने शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. निवेदनात, नगर परिषदेच्या दुकानांची ुउंची दुरूस्तीच्या नावावर वाढवून देण्याच्या मंजूरीसाठी पाच लाखांची घुस घेतली जात आहे. तसेच स्टेडियम व नगर परिषद शाळेच्य मधात असलेली सुमारे अडीच हजार स्वे. फुट जागा एका खाजगी संस्थेला देण्यात आली. बिना निविदा ७0 हजार रूपयांचे वर्क ऑर्डर देऊन मोठय़ा निविदांत नियमबाह्य अटी लावून काही लाडक्या कंत्राटदारांना काम दिले जात आहे. याविरोधात कमिटीने कमल ३0८ अंतर्गत आक्षेप नोंदविला असून जिल्हाधिकार्‍यांनी त्वरीत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवासी जिल्हाधिकारी लोणकर यांना निवेदन देताना शहर अध्यक्ष अशोक चौधरी, नगरसेवक व्यंकट पाथरू, माजी नगरसेवक शकील मंसूरी, अजय गौर, उमाशंकर गर्ग, महिला शहर अध्यक्ष योजना कोतवाल, अपूर्व अग्रवाल व अन्य उपस्थित होते.