महाराष्ट्र सरकारच्या विरोधात ७ एप्रिलला जिल्हास्तरावर आंदोलन

0
9

नागपूर-महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत ओबीसी समाजासोबत केलेल्या सापत्न वागणुकीसोबतच सामाजिक न्यायमंत्र्यानी ओबीसीविरुध्द काढलेल्या अपशब्दांचा निषेध नोंदविण्यासाठी येत्या ७ एप्रिल रोजी विदर्भातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्धार नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत ओबीसींच्या न्यायमागण्यासांठी जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलने सुरू आहेत.तेथील नेत्यांची त्यांच्या भागात मोठी ताकद आहे.पण,हे एकसंध नसल्याने समाज विखुरलेल्या अवस्थेत आहे.समाजाची ताकद सरकारला कळून येत नाही.बहुसंख्य असतानाही त्याला आपल्या मागण्या पदरी पाडून घेण्यासाठी लढा द्यावा लागत आहे.पण,आता हे पुरे झाले.आगामी २०१९ च्या निवडणुकांमध्ये ओबीसीची ताकद दाखवून देण्यासाठी २०१८ मध्ये ओबीसी यात्रा प्रत्येक जिल्ह्यात काढून आपली ताकद दाखवू असा सूर विदर्भस्तरीय ओबीसी संघटनेच्या बैठकीत व्यक्त झाला.तसेच सामाजिक न्यायमंत्री म्हणून ना.बडोले यांच्या तोंडून जे वक्तव्य निघाले ते अपमानजनक असल्याने सामाजिक न्यायमंत्री म्हणूनच त्यांच्या त्या व्यक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी पहिल्या टप्यात ७ एप्रिलला आंदोलन करण्याचा निर्धार घेण्यात आला.
ही बैठक ओबीसी कृती समितीचे संयोजक सचिन राजूरकर व महात्मा फुले समता परिषदेचे विदर्भ प्रमुख प्रा.दिवाकर गमे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.बैठकीच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ पदाधिकारी बबनराव फंड होते.बैठकीला वध्र्येच्या सत्यशोधक समाजाच्या प्रा.नूतन माळवी,ओबीसी मुक्ती मोर्चाचे नितीन चौधरी,ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पाडुंरंग काकडे,प्रा.शरद वानखेडे,गोंदिया ओबीसी संघर्ष कृती समितीचे बबलू कटरे,अमर वराडे,भंडारा ओबीसी सेवा संघाचे गोपाल सेलोकर,कैलास भेलावे,विनायक येडेवार,गडचिरोली ओबीसी कर्मचारी फेडरेशनचे प्रा.शेषराव येलेकर,अमरावतीचे अ‍ॅड.बेलसरे,गडचिरोली ओबीसी संघटनेचे अध्यक्ष रमेश मडावी,नागपूर भाजप व्यापारी आघाडीचे श्रावण फरकाडे,युवा भोयर पवार मंचचे मनोज चव्हाण,वर्धेचे अविनाश काकडे,बुलडाणाचे प्रा.सदानंद माळी,अखिल भारतीय पिछडा स(ओबीसी)संघटनेचे प्रा.रमेश पिसे,कुंभार समाजाचे प्रतिनिधी गोqवद वरवाडे,नागपूर ओबीसी सेवा संघ अध्यक्ष विजय तपाडकर,खैरे कुणबी बहु.संस्थेचे सचिव हेमराज माले,फुले आबेंडकर स्टडी ग्रुपचे अध्यक्ष प्रा.एस.टी.चिकटे,नागपूर मनपा स्थायी समिती अध्यक्ष जयंतराव लुटे,गडचिरोलीचे प्रा.चापले आदी मंचावर उपस्थित होते.
ओबीसी कार्यकर्ते जेव्हा सामाजिक न्यायमंत्री यांना जेव्हा भेटले त्यानंतर त्यांनी वापरलेले असभ्य शब्द अपमानजनक असल्याचे ओबीसी संघटनेचे म्हणणे आहे.तथापि सामाजिक न्यायमंत्र्यांनी आपण असे बोललो नसल्याचे म्हटले.तथापि,गोqदया जिल्ह्यातील या घटनेमुळे राज्यभरातील ओबीसी जनता संतापली आहे,असे मत संयोजक सचिन राजूरकर यांनी प्रास्ताविकात मांडले.आपले नेते सत्ता मिळाल्यावर आपले राहत नाहीत.ओबीसींच्या पाठिंब्याशिवाय निवडून येणे शक्यच नव्हते.परंतु आज ते आपल्याविरोधात बोलण्याची qहमत करीत आहेत.त्यामुळे आम्ही आमचे मत परत मागितले पाहिजे असे विचार नितीन चौधरी यांनी व्यक्त केले.बहुसंख्य ओबीसी हेच शेतकरी आहेत.त्यामुळे शेतकरी आत्महत्या हा प्रश्नही आपल्या अजेड्यांवर असला पाहिजे असे मत प्रा.दिवाकर गमे यांनी व्यक्त केले.जयंत लुटे यांनीआपल्याला संघटित होण्याची वेळ असून आपला ओबीसीचा मंत्रीही वेगळा वागत असेल तर त्यांनाही वठणीवर आणावे लागेल.नेत्याला स्वतःचे नव्हे तर ओबीसीचे भले बघावे लागेल असे मत व्यक्त केले.अ‍ॅड.अशोक यावले यांनी आपली शक्ती दाखविण्याची वेळ आली आहे.ओबीसी संघटनेच्या पाठीशी सर्वांनी राहावे.

माजी मुख्य अभियंता बांगरे यांनी अधिकारी व कर्मचारी वर्गातही ओबीसीचे शोषण होत असून मंत्री नेहमीच खोटे बोलतात असे सांगत ओबीसींनी कुठल्याही पक्षाच्या मागे न धावता पक्षच तुमच्या मागे धावले पाहिजे अशी स्थिती निर्माण करा.आपण आधी नोकरीतील ओबीसीचा बँकलाग भरा नंतरच दुसरी पदे भरा यासाठी दबाव आणला पाहिजे अन्यथा नोकरीतूनही आपला समाज खूप दूर राहणार अशी खंत व्यक्त केली.अमरावतीचे प्रा.प्रदीप गावंडे यांनी ओबीसीना जागृत करण्यासाठी १० गावांचा एक गट तयार करून जनजागृती मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले.त्यासाठी मी स्वतः अमरावती जिल्ह्यात पुढाकार घेतो असे म्हणाले.गडचिरोलीचे रमेश मडावी यांनी आम्ही गडचिरोलीत ७० दिवस आंदोलन चालविले त्याची अखेर दखल शासनाला घ्यावी लागली पुन्हा आंदोलन करू.चंद्रपूरचे हिराचंद बोरकुटे यांनी आमची आदर्श काय आहेत याचा विचार व्हावा आजही आम्ही बाबासाहेबांना सोडून तुरुंगांत असलेल्या साधुसंतांच्या मागे धावतो यातच आम्ही आपली शक्ती वाया घालवीत असल्याचे खंत व्यक्त केली.आमचे आमदार,खासदार व मंत्री स्वतः नाही तर ते रेशीमबागेतून आलेल्या सूचनेवरून बोलतात तसेच काही सामाजिक न्यायमंत्र्याच्या बाबतीत घडले असावे असेही ते म्हणाले.प्रा.नूतन माळवी यांनी सरकारने आधी २०११ मध्ये झालेली जनगणना जाहीर करायला पाहिजे त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही.आणि मंत्र्यांनी ओबीसीप्रती काढलेले शब्द हे त्यांनी जनतेचा आदर म्हणून मागे घ्यावे अशा म्हणाल्या. प्रा.शरद वानखडे यांनी विदर्भाचे ओबीसींचे फेडरेशन व्हावे.कायमस्वरूपी मुद्दे घेऊन लढा सुरू राहिला पाहिजे.ब्राम्हणवाद्याला बळी पडू नका असे म्हणाले.

बबलू कटरे यांनी २८ मार्च रोजी ओबीसी संघर्ष कृती समिती आणि सामाजिक न्यायमंत्री यांच्यासोबत घडलेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.अमर वराडे यांनी नागपूर उपराजधानीचे स्थल असल्याने प्रत्येक आंदोलनाची दखल घेत याठिकाणाहून ठिणगी उडाली पाहिजे असे विचार मांडले.प्रमोद काळबांडे यांनी आपण कधीपर्यंत दुसèया पक्षाच्या मागे धावणार ओबीसी ,एसी एसटींनी एकत्र येऊन २०१९ ची निवडणूक विदर्भातील ६२ मतदारसंघात लढवावी.यामध्ये ज्या मतदारसंघात ज्याची संख्या अधिक असेल त्यास उमेदवारी देऊन सर्व राजकीय पक्षाच्या विरोधात नवी शक्ती उभे करण्यावर विचार व्हावा असे सांगत ओबीसींना संघटितपणाशिवाय यश नसल्याचेही म्हणाले.युवा भोयर समाजाचे मनोज चव्हाण यांनी ओबीसी समाजातील युवक आरक्षणाप्रती नकारात्मक विचार करत असल्याने त्यांना वास्तविकता पटवून देण्यासाठी कार्यक्रमाची गरज असल्याचे विचार मांडले.बैठकीला विदर्भातील २०० च्या वर प्रतिनिधी विविध ओबीसी संघटनांचे उपस्थित होते.बैठकीचे संचालन प्रा.शेषराव येलेकर यांनी संचालन केले.तर आभार खेमेंद्र कटरे यांनी मानले.