साईबाबाला सुप्रीम कोर्टाने दिला जामीन

0
5

 नागपूर -देशद्रोहाच्या आरोपांतर्गत कारागृहात बंदिस्त असलेले दिल्ली युनिवर्सिटीचे प्राध्यापक जीएन साईबाबाचा जामीन आज सुप्रीम कोर्टाने मंजूर करीत साईबाबाला ताबडतोब कारागृहातून मुक्त करण्याचे आदेश दिले. सर्व साक्षीदारांच्या साक्षींची नोंद होऊनही साईबाबाच्या जामीन अर्जाला विरोध करणाऱ्या सरकारी वकिलाला यावेळी खंडपीठाने चांगलेच खडसावले.देशविरोधी आणि माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपावरून दिल्ली युनिवर्सिटीचे प्राध्यापक जीएन साईबाबा यांना महाराष्ट्र पोलिसांनी २०१४ मध्ये अटक केली होती.तेव्हापासून ते नागपूर आणि गडचिरोलीच्या कारागृहात बंदिस्त होते.काही काळासाठी जामिनावर ते बाहेरही आले होते. कारागृहात बंदिस्त असलेल्या जीएन साईबाबा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने गडचिरोली कोर्टाला दररोज सुनावणी करण्याचे आदेश गेल्या महिन्यातच दिले होते व आठ साक्षदारांची साक्ष घेण्याकरिता एक महिन्याची मुदत दिली होती. महाराष्ट्र पोलिसांनी दिल्ली युनिवर्सिटी प्रोफेसर साईबाबा यांच्या समवेत पाच जणांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.