गोंदिया रेल्वेस्थानकाच्या नोव्हेंबरपर्यंत कायापालट-आलोककुमार

0
8

गोंदिया-दक्षिण मध्य पुर्व रेल्वेचे नागपूर मंडळाचे व्यवस्थापक आलोक कुमार यांनी आज गोंदिया रेल्वेस्थानकाला भेट देऊन विविध कामाची पाहणी केली.तसेच पार्कींगच्या कार्यक्षेत्राबाहेरिल वाहनाकडूनही होत असलेल्या वसुलीबद्दल रेल्वेच्या स्थानिक अधिकाèयांना फटकारले.यावेळी आलोक कुमार यांनी गोंदिया रेल्वेस्थानकाचा येत्या नोव्हेंबरपर्यंत कायापालट होणार असल्याचे सांगितले.आलोककुमार यांनी सांगितले की ८ कोटी रुपयाची विविध कामे करण्यात येत आहेत.त्यामध्ये एस्केलटर,ओव्हरब्रीज आणि लिप्टचा समावेश आहे.यात लिफ्टचे काम अर्धापर्यंत पोचले असून एफओबीच्या कामालाही सुरवात झाली आहे.तर होमप्लेटफार्मच्या शेजारील भागात एप्रिलपर्यंत शेड घालण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे प्लेट फार्म क्रमांक १ वरुन नागपूरसाठी गाडी सोडण्याचे काम जवळपास पुर्ण झाले असून या महिन्यात सिग्नल सिस्टचची तपासणी केल्यानंतर गाड्या सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.सोबतच प्लटफार्म क्र.२ चे विस्तारीकरण सुध्दा हाती घेण्यात आल्याचे म्हणाले.अनेक दिवसापासून प्रलqबत असलेला मालधक्का स्थानातरणांचा प्रश्न जिल्हाधिकारी यांच्याकडे असल्याने ते काय निर्णय घेतात त्यावर अवलबून असून रेल्वेने हिरडामाली रेल्वेस्थानक परिसरात मालधक्का स्थानातरींत करण्याचा निर्णय घेतला आहे.गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर नागभीडपर्यंत २५ केव्ही विद्युत लाईनचे काम पुर्ण झाल्याचे सांगतने गोंदिया स्थानकाचा आदर्श स्थानकात समावेश झाल्याने पुन्हा विकासकामासाठी २ कोटी रुपये मिळणार असल्याचेही ते म्हणाले.रेल्वेगाड्या धुण्यासोबतच इतर कामासाठी जो पाणी वापरला जातो तो वेस्टेज पाणी पुन्हा रिसायकल करुन वापरण्यासाठी सुध्दा प्रकल्प हाती घेण्यात आला असून रेल्वेच्या तलाव सौदर्यींकरणाचा प्रश्न नगरपरिषदेकडे पाठविल्याचे म्हणाले.