संघर्ष समितीचे अनिश्चित कालीन साखळी उपोषण सुरू

0
44

# नगर परिषदेच्या न्यायप्रविष्ट प्रकरणावरून नागरिक संतप्त

आमगाव:-आमगाव नगर परिषदेच्या शासनाद्वारे सर्वोच्य न्यायालयातील प्रलंबित प्रकरणामुळे नागरिक अनेक आंदोलने करीत आहेत,आज नागरिकांनी मागणी पूर्ण होत नसल्याने अनिक्षित कालीन उपोषण सुरू केले आहे.
आठ वर्षांपासून नागरिक विकासापासून वंचित पडले आहेत.
समाविष्ट आठ गावातील नागरिकांना केंद्र व राज्यसरकारने नागरिक लाभाच्या योजना बंद करून वेठीस धरले आहे.
नागरिकांना घरकुले,राष्ट्रीय रोजगार हमीचे कामा पासून वंचित व्हावे लागले,आर्थिक अडचणीत रोजागर उपलब्ध नसल्याने नागरिक हताश होऊन गेली आहेत. वाढीव लोकसंख्या प्रमाणात नवीन योजना नसल्याने पाण्याची चणचण नागरिकांना भासली आहे,गलिच्छ वस्त्या,गटारे यांची वाढती समस्यांनी नागरिक ग्रस्त ठरले आहेत.
महाराष्ट्र सरकारने मागील आठ वर्षांपासून नगरपरिषद स्थापनेचा वाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल करून प्रकरण निकाली काढली नाही .

राज्य शासनाने न्याय प्रविष्ट प्रकरणामुळे राज्य सरकारने नगर परिषद मधे प्रशासक कारभार सुरू ठेवला आहे.यामुळे प्रलंबित न्यायप्रविष्ट असल्याने सन २०१४ नंतर याठिकाणी सार्वत्रिक निवडणूक झाली नाही. लोकप्रतिनिधी निवडणूक झाली नसल्याने व योजना विकास निधी मंजूर करण्यात आले नाही त्यामुळे या भागाचा विकास झाला नाही.
नगर परिषद मधील आमगाव,बनगाव,किडंगीपार,माली,पदमपुर,कुंभारटोली,बिरसी, रिसामा ,या आठ गावांना राज्य सरकारने न्याय मिळवून देण्यासाठी नागरिक सहभागाने नगर परिषद संघर्ष समितीने मध्यप्रदेश राज्यात विलीनीकरणाचा मागणी नंतर मुंडन मोर्चा,जण आक्रोश मोर्चा यापूर्वीच करून शासनाचे लक्ष वेधले होते, परंतु या आंदोनलची शासनाने दखल घेतली नाही.त्यामुळे नागरिक आता संतप्त होऊन मागणी मान्य होत नाही तोपर्यंत अनिश्चित कालीन उपोषण तहसील कार्यालय समोर २१ मार्च पासून सुरू केले आहे.
यावेळी जगदीश शर्मा, रवी क्षीरसागर, यशवंत मानकर,संजय बहेकार,उत्तम नंदेंस्वर,सुभाष आकरे,अजय खेताण,रामेश्वर श्यामसुंदर, पिंकेश शेंडे,मंगरू अंबुले,प्रा.व्ही.डी. मेश्राम,महेश उके, युवराज उपराडे,सुनंदा येरणे,जयश्री पुंडकर, दिलीप टेंभरे,आनंद भावे,योगेश रामटेके,घनश्याम मेंढे,समीर खान,उमेश चतुर्वेदी, गुणवंत बिसेन,ए. डी. मुरकुटे,रामकीशन शिवणकर,राजकुमार चुटे,राजेश मानकर,राधाकिशन चुटे,राजेश मेश्राम,रवी अग्रवाल,गंगाराम येळे, वामन कावळे,रितेश अग्रवाल, सुनील बडोले,मनोज सोमवंशी, विठ्ठलराव डोये यांनी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रा चे पूजन करून साखळी उपोषण सुरू केले. यावेळी नागरिक उपस्थित होते.