वर्ग २ च्या अधिकाèयांना सोडून वर्ग ३ च्या पर्यवेक्षिकांना सीडीपीओचा प्रभार

0
5

गोंदिया-महिला बालकल्याण विभागाच्यावतीने तालुकास्तरावर संचालित अंगणवाडी केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी बालविकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले आहे.परंतु गेल्या दोन वर्षापासून गोंदिया जिल्ह्यातील वर्ग २ मध्ये येत असलेल्या ९ बालविकास अधिकारी हे पद वर्ग ३ मध्ये येत असलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिकांना सोपविण्यात आला आहे.जेव्हा की गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गतच्या ८ पंचायत समितीमध्ये वर्ग २ मध्ये येणारे सहाय्यक गटविकास अधिकारी हे कार्यरत आहेत.त्यांना या पदाचा प्रभार न देण्यामागचे काय आर्थिक राजकारण या विभागाचे आहे हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही.
गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत गोंदिया बालविकास कार्यालय क्र.१ मध्ये श्रीमती ए.एल.भुसावळकर,गोंदिया कार्यालय क्र.२ मध्ये अंजली बावनकर,तिरोडामध्ये श्रीमती ए.डी.ढोरे,सालेकसामध्ये एल.बी.शहारे,आमगावमध्ये आर.एस.गौर,गोरेगावमध्ये श्रीमती अन्विता श्रीवास्तव,सडक अर्जुनी मध्ये श्रीमती सूर्यकांता बागडे,अर्जुनी मोरगाव मध्ये यु.वाय.आगाशे आणि देवरीमध्ये श्रीमती पी.एम.रोही यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला त्या पर्यवेक्षिका वर्ग ३ मध्ये मोडतात. जेव्हा की बालविकास प्रकल्प अधिकारी हे पद वर्ग २ मध्ये येते.
प्रभार हा कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाèयाकडे सोपवून प्रशासन काय साध्य करु इच्छिते कुणास ठाऊक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत येणाèया महिला बालविकास विभागांतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारीचे ९ पद मंजूर आहेत.त्यापैकी एकही पद अद्याप पद भरण्यात आलेले नाही.या पदाचा प्रभार हा अगंणवाडी पर्यवेक्षिका यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.जेव्हा गोंदिया जिल्हा परिषदेत सहाय्यक गटविकास अधिकारी हे पंचायत समितीला असताना त्यांच्याकडे हा प्रभार न देता पर्यवेक्षिकांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यामागची भूमिका प्रशासनाची स्पष्ट होत नाही.
त्यातील बहुतांश पर्यवेक्षिका या आपल्याकडे सीडीपीओचाच प्रभार असल्याने कशाला अंगणवाडीना भेट द्यायचे दौरे करायचे या भूमिकेतही दिसून येतात.बहुतांश प्रभारी तर हे रेल्वेने नागपूरवरुन अपडाऊन करतात.विदर्भ एक्स्प्रेसने येतात आणि सायकांळी अहमदाबादने कसे जायला मिळेल यामध्येच त्यांचा दिवस जात असतो.या सर्व प्रकारामुळे एक ना धड भराभर qचध्या सारखी अवस्था बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाची झाली आहे.