ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी धरणे आंदोलन

0
8

गोंदिया,दि.५-महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत ओबीसी समाजासोबत केलेल्या सापत्न वागणुकीसोबतच सामाजिक न्यायमंत्र्यानी ओबीसीविरुध्द काढलेल्या अपशब्द तसेच ना.गिरिष महाजन यांच्याकडून तेली समाजाबद्दल निघालेल्या अपशब्दाचा निषेध नोंदविण्यासाठी येत्या गुरुवारी ७ एप्रिल रोजी दुपारी १२ गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,बहुजन संघर्ष समिती,प्रांतिक तेली महासभा यांच्यासयुक्तवतीने करण्यात आले आहे.या आंदोलनात सरकारने ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणे,ओबीसीचंी जनगणना करुन ती जाहिर करणे तसेच केंद्रसरकारने लागू केलेल्या फ्रीशीप शिष्यवृत्तीला केंद्राप्रमाणेच राज्यात लागू करणे.क्रिमिलेयरची अट कायमची रद्द करणे आदी मागण्यांचे निवेदन सुध्दा या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ओबीसी संघर्ष कृती समितीचे बबलू कटरे,अमर वराडे,राजेश चांदेवार,उध्दव मेहदंळे,कैलाश भेलावे,मनोज मेंढे,आशिष नागपूरे,कृष्णा ब्राम्हणकर,ओम पटले,विवेक मेंढे,दिलिप चव्हाण,सावन कटरे,बी.एम.करमकर,विनायक येडेवार,रमेश चुटे,डॉ.देशमुख,उमेंद्र भेरावे,हरीराम येळणे,संतोष खोब्रागडे,डॉ.संजीव रहांगडाले,प्रा.रामलाल गहाणे,भोजराम फुंडे आदींनी केले आहे.