अप्पर पोलीस अधिक्षकाच्या नेतृत्वात ६ पथके तपासासाठी

0
11

गोंदिया-गोंदियाचे आमदार व लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांना पत्रकारपरिषदेत जाऊन मारहाण करणारे भारतीय जनता पक्षाचे स्विकृत नगरसेवक शिव शर्मा यांच्याविरुध्द रामनगर पोलीसात फिर्यादी विशाल गोपालदास अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारीनंतर पोलीस अधिक्षक शशीकुमार मीणा यांनी अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.संदिप पखाले यांच्या नेतृत्वात आरोपीच्या शोधासाठी ६ पथके तयार करुन शोधार्थ रवाना केली आहेत.
रामनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत विशाल अग्रवाल यांनी आपले वडील आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर ९ एप्रिल रोजी सायकांळी १८.३० ते १९ वाजता दरम्यान पत्रकार परिषद सुरु असताना शिव शर्मा व राहुल श्रीवास यांनी विना परवनगी पत्रकार परिषदेमध्ये येऊन मारहाण केली.तसेच आपल्या वडीलाचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला आहे. आपण वडिलाला वाचविण्यासाठी गेले असता शिव शर्मा यांनी धारदार शस्त्राने आपल्यावर हल्ला करुन पळून जातांना आपणास व वडीलास पुढे जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही म्हटले आहे.विशाल अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी भांदवी कलम ३०७,२९४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करुन सहा.पोलिस निरिक्षक ताईतवाले यांच्याकडे तपास दिला आहे.