सलग दुसर्या दिवसीही गोंदिया बंद ;आमदार अग्रवाल मारहाण प्रकरण

0
8
गोंदिया : महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सर्वदलीय मोर्चा काढून आरोपीला अटक करण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड यांना देण्यात आले. दरम्यान सलग दुसNया दिवशीदेखील गोंदिया शहर बंद होते.
शहरातील सर्कर्स मैदान येथून आज (दि.११) सकाळी १०.३० वाजता दरम्यान शांततापूर्व मोर्चा काढण्यात आला. शहरातील गांधीप्रतिमा, चांदणीचौक, दुर्गा चौक, नेहरू चौकाकडून जयस्तंभ चौकाकडे निघाला. दरम्यान हा मोर्चा पोलीस उपविभागीय कार्यालय येथे पोहचला. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या नावे असलेले निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात आमदार अग्रवाल यांच्यावर हल्ला करणार्या आरोपींवर मोक्का लावण्यात यावा तथा त्वरीत अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. लोकप्रतिनिधींवर जर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न देखील मोर्चेकरेंनी उपस्थित केला आहे.  दरम्यान मोर्चेकर्यांची भावना लक्षात घेवून पोलीस उपविभागीय अधिकारी रामदास राठोड यांनी सांगितले की, पोलीस विभाग आपले कर्तव्य बजावत असून आरोपींना पकडने ही प्राथमिकता आहे.
घटनेच्या दुसNया दिवशी देखील गोंदिया शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. त्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसला.  मोच्र्यात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जि.प.अध्यक्षा उषाताई मेंढे, विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन, भंडारा-गोंदिया लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुर्ल अग्रवाल, जि.प.सभापती पी.जी.कटरे, राईसमिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, माजी अध्यक्ष दामोदर अग्रवाल, अशोक चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, छैलबिहारी अग्रवाल, गोंदिया मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष राधेलाल पटले, सहेषराम कोरोटे, जहीर अहमद,विशाल अग्रवाल, अमर वर्हाडे, मुकेश बारई, मनिष सोनी, राजेंद्रसिंग बग्गा, गंगाधर परशुरामकर, माजी मंत्री भरत बहेकार, अपुर्व अग्रवाल, झामसिंग बघेले, राजेश नंदागवळी आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.