जि.प.मधील यूती संदर्भात एका महिन्यात निर्णय-खा.नाना पटोले

0
7

गोंदिया-न.प.च्या राजकारणाला घेवून कांग्रेसवर आरोप व प्रत्यारोप करता मात्र जि.प.च्या राजकारणात कांग्रेस व भाजप गळ्यात हात घालून नांदत आहे त्याचे काय? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता. या संदर्भात ही विचार करण्याची गरज असून येत्या १ महिन्ङ्मात याबद्दल भारतीय जनता पक्ष कांग्रेस सोबत असलेल्या यूती संदर्भात निर्णय घेणार अशीही माहिती खा. नानाभाऊ पटोले यांनी दिल्यामुळेजिल्हा परिषदेतील राजकारणातही लवकरच बदल होणार असे चित्र बघावयास मिळणार आहे.

कांग्रेसचे आ‘दार गोपालदास अग्रवाल याना भाजपचे स्विकृत नगरसेवक शिव शर्मा यांनी केलेली मारहाण अंत्यंत निदनीय घटना असून या घटनेचा आम्ही निषेध करित आहोत.सदर बाब भाजपच्या ध्येय धोरण व संस्कृतीत बसत नसल्यामुळेच मारहाणीच्या घटनेच्या ३ तासातच शिव शर्मा यांना भारतीय जनता पार्टीतून निलंबित करण्यात आले.इतकेच नव्हे तर त्यांचे स्विकृत नगरसेवकाचे पद रद्द करण्यासाठीही भाजप कार्यवाही करित आहे.मात्र या संदर्भात कांग्रेस व राष्ट्रवादीचे नेते भाजप वर ज्या प्रकारचे आरोप लावत आहेत ते हास्यास्पद असून या घटनेच्या निमित्ताने राजकारण केले जात असेल व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात असले तर भाजपा कदापी सहन करणार नाही असा इशारा स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गोंदिया-भंडाराचे खासदार नानाभाऊ पटोले यांनी दिला.

या प्रसंगी गोंदिया जिल्हा भाजपा अध्यक्ष हेमंतभाऊ पटले,विनोद अग्रवाल, शहर भाजपा अध्यक्ष सुनील केलनका,रेखलाल टेंभरे,गुड्डू कारडा,नगराध्यक्ष कशिश जायस्वाल आदि उपस्थित होते. नाना पटोले पुढे म्हणाले की,गोंदिया शहराला गुंडागर्दी व भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे.त्या विरोधात कांग्रेसने सुरू केलेल्या आंदोलनाला आमचाही पाठिबां आहे. ज्या प्रकारे भाजपने या घटनेचा निषेध म्हणून शिव शर्माला पक्षातून निलंबित केले. त्याप्रमाप्रमाणे कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसने त्याच्या ज्या नेतृत्वाच्या  विरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.त्याना पक्षातून काढावे म्हणजे राजकारणतील गुंडगिरी दुर होईल. भाजपला न.प.मध्ये आता सत्ता मिळाली आहे.मागील १५ वर्षापासून कुणाची सत्ता होती.या १५ वर्षात जे भ्रष्टाचार झाले त्यांचीही चौकशी व्हायला हवी या घटनेची प्रतिक्रिया म्हणून शहरात कांग्रेसचे कायकर्ते तोडफोड करित आहेत.शिव शर्मा दोषी आहे.त्याच्या विरूद्ध कायदेशीर कार्यवाही करा मात्र त्याच्या घरावर हल्ला नेवून तोडफो़ करण्याचा अधिकार कुणी दिला आहे व या प्रकरणी पोलीस विभाग सुडबुद्धीने कार्यवाही करत असल्याचा ही आरोप नाना पटोले यांनी लावला तसेच आजचा बंद तसेच यापुढील बंदला भाजपचा पाठिंबा नाही असे म्हणाले.