सामाजिक न्याय पर्वानिमीत्य अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याबाबत जनजागृती

0
13
वाशिम,दि.२2- जिल्ह्यात सामाजिक न्याय पर्व राबविण्यात येत आहे.या निमित्ताने आज २१ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
          अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती वाशिमचे अध्यक्ष डॉ.रामकृष्ण कालापाड, प्रमुख पाहुणे मानसोपचार तज्ञ डॉ. मंगेश राठोड,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती वाशिमचे कार्याध्यक्ष  पी. एस. खंदारे,स्त्री अबृरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक भालेराव, सहायक आयुक्त मारोती वाठ उपस्थित होते.
        प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले.महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
       प्रास्ताविकात श्री.वानखडे यांनी अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याबाबत थोडक्यात माहिती देवून कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.
      श्री. भालेराव यांनी अंधश्रद्धेमुळे समाजातील गरीब लोकांचे शोषण केले जात आहे.त्यांना आळा घालण्यासाठी या कायद्याचा खुप उपयोग होत असल्याचे सांगितले.
      डॉ.राठोड म्हणाले,आपले मन हेच बहुतांश आजाराचे कारण आहे.तसेच अंगात येणे,भानामती हे सर्व मानसिक आजाराचे लक्षण असून आधुनिक विचाराची कास धरण्याचे आवाहन यावेळी केले.
        श्री.खंदारे यांनी प्रत्यक्ष विविध प्रयोगाचे सादरीकरण करुन काही भोंदू लोक कशी समाजाची कशी दिशाभुल करतात याबाबत सांगितले.अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याच्या जनजागृत्तीमध्ये त्यांना आलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडले.आपल्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीची माहिती त्यांनी सांगितली. तसेच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी या कायद्यासाठी घेतलेले प्रयत्न व त्यांचे विचार उपस्थितांसमोर मांडले.
        श्री. वाठ यांनी अंधश्रद्धा कायद्याची माहिती देवून जिल्ह्यातील सर्व नागरीकांपर्यंत ती पोहचवण्याचे आवाहन केले.तसेच समाज कल्याण विभागाद्वारे वेळोवेळी आयोजित केलेल्या कार्यशाळेची माहिती त्यांनी दिली.
         डॉ. कालापाड यांनी अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याची पार्श्वभूमी सांगून कायदा पारीत व अंमलबजावणी करण्यासाठी कराव्या लागलेल्या प्रयत्नांबाबत माहिती सांगितली. तसेच अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याच्या विविध कलमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
              संचालन प्रदिप गवळी यांनी केले.आभार हरीष वानखेडे यांनी मानले.कार्यक्रमाला नागरीक, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी,शासकीय वसतीगृहातील गृहपाल,शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग,सर्व ब्रिक्स प्रा.लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.