नागपूर संघाची नाही तर बाबासाहेबांची भूमी : कन्हैया

0
13

विशेष प्रतिनिधी

नागपूर :  नागपूर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी नसून ही बाबासाहेबांची भूमी असल्याचे वक्तव्य, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ( जेएनयूतील) विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारने नागपुरात केले.आज कन्हैय्या कुमार नागपूर येथे आला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती कार्यक्रमानिमित्त आला असता बोलला.त्याआधी  कन्हैया कुमारची गाडी अडवण्याचा प्रयत्न आज गुरुवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी या प्रकरणी बजरंग दलाच्या सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ‘जय श्री  राम’च्या घोषणा देत निदर्शकांनी कन्हैयाची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या  जयंतीनिमित्त कन्हैया नागपूरमध्ये आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमीत्त कन्हैया कुमारने नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाऊन दर्शन घेतले.  त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होता.“भारत हा लोकशाही देश आहे, हा देश मनुस्मृतीनुसार चालणार नाही. संघ नागपूरला बदनाम करत आहे. मात्र नागपूरची भूमी ही संघाची नसून, ही बुद्धांची, बाबासाहेबांची दीक्षा भूमी आहे” असं कन्हैया म्हणाला.