विदर्भ एक्स्प्रेस शुक्रवारपासून तिरोडात

0
9

तिरोडा -रेल्वे स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेस थांबावी, ही तिरोडावासीयांची अनेक दिवसांपासूनची मागणी येत्या शुक्रवारपासून पूर्णत्वास येत आहे. विदर्भ एक्स्प्रेसला तिरोडा येथे थांबा दिला जाणार आहे. सध्या प्रायोगीक तत्वावर याला रेल्वेने मंजुरी दिली असून येथून मिळणार्‍या महसुलावरच याचे भवितव्य निर्भर आहे. यानुसार येत्या शुक्रवारपासून तिरोडा रेल्वे स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेस थांबणार असल्याचे पत्र १३ एप्रिल रोजी निर्गमित करण्यात आले आहे. सध्या सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर गाडी येथे थांबवीली जाणार आहे.
मात्र येथून मिळणार्‍या महसुलावर गाडीच्या थांब्याचे भवितव्य निर्भराहणार असल्याचीही माहिती आहे.
तिरोडा शहराचा व्याप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा या दोनच ठिकाणी नगर परिषद आहेत. तिरोडा येथे अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड हा अदानी समुहाचा वीज निर्मितीचा मोठा प्रकल्प आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचा मार्ग या शहरातून जातो. येथील नागरिकांना आपल्या विविध कामांसाठी नेहमीच नागपूर ते मुंबई प्रवास करावा लागतो.त्यासाठी नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून तिरोडा स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेसचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी आ. विजय रहांगडाले यांच्याकडे रेटून धरली होती.
आ.रहांगडाले यांनी सदर थांब्यासाठी रेल रोको आंदोलनाचा पवित्रा घेवून तसे पत्र डीएमआर आलोक कंसल यांना पाठविले होते. मात्र प्रत्युत्तरात कंसल यांनी थांबा देणे हे आमच्या हाती नसून ते रेल्वे बोर्डाच्या हाती असते, त्यामुळे कृपया सदर आंदोलन करण्यात येवू नये, अशी विनंती केली होती.
यानंतर आंदोलन तर रद्द झाले, पण आमदार रहांगडाले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तशी मागणी केली. शिवाय तिरोडावासियांनी गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार नाना पटोले यांनाही निवेदन देवून तिरोडा येथे विदर्भ एक्स्प्रेसच्या थांब्याची मागणी केली होती.गरिकांची मागणी व लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने तिरोडा येथे प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांसाठी थांबा देण्याचे मान्य केले.