अदानी फाऊंडेशनचा पुढाकार :तिरोडा रुग्णालयाचा ‘कायाकल्प’

0
7

गोंदिया : राज्याच्या पूर्व टोकावरील नक्षलग्रस्त आणि आदीवासीबहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आता आरोग्य सेवेत आमुलाग्र बदल होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांची ‘कायाकल्प’ ही संकल्पना अनेक चांगले बदल घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.d964392-large येथील उपजिल्हा रुग्णालयातही याच संकल्पनेतून आणि अदानी ग्रुपच्या अदानी फाऊंडेशनच्या पुढाकाराने विविध अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे खर्‍या अर्थाने उपजिल्हा रुग्णालयाचा ‘कालाकल्प’ झाला असून तालुका स्तरावर अशा परिपूर्ण सुविधा असणारे हे एकमेव रुग्णालय ठरले आहे.
तिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील आयसीसीयू विभागाचे अत्याधुनिकरण, आकस्मिक सेवा कक्ष, प्रयोगशाळा, ओपीडी कक्ष आदींमध्ये अदानी फाऊंडेशनच्या सामाजिक सेवा विभागाकडून निधी उपलब्ध करून विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी तिरोडा भेटीदरम्यान उपजिल्हा रुग्णालयातील कमतरता भरून काढण्यासाठी अदानी पॉवर प्रोजेक्टअंतर्गत काम करणार्‍या अदानी फाऊंडेशनकडे प्रस्ताव दिला होता. ग्रामीण नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरेशा प्रमाणात मिळावे या उद्देशाने जिल्हाधिकार्‍यांच्या या संकल्पनेला अदानी फाउंडेशनने मूर्त रूप दिले.
विशेष म्हणजे डॉ.सूर्यवंशी यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी असताना ग्रामीण आरोग्य सुविधांसाठी ‘कायाकल्प’ ही संकल्पना राबविली होती.जिल्हाधिकार्‍यांच्या संकल्पनेला तिरोड्यात प्रत्यक्षात साकारण्यासाठी अदानी फाऊंडेशनने लगेच आधुनिकीकरणाचे काम सुरू करून ते काही महिन्यांपूर्वीच पूर्णत्वासही नेले. त्यामुळे आता नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळणे सुरू झाले आहे. नागरिकांनी या सुविधांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन अदानी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले. एवढेच नाही तर ‘कायाकल्प’मध्ये अजून कोणत्या सुविधा असाव्या याबद्दल सूचना असल्यास अदानी फाऊंडेशनकडे संपर्क करावा, जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात त्या सुविधा देण्यासाठी आम्ही तत्पर राहू, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला.