मोहाडी तालुका आधारभूत धान खरेदी संघाच्या अध्यक्षपदी हैशोक शरणागत

0
18

मोहाडी,दि.22ः मोहाडी येथील शेतकी खरीदी विक्री केंद्र येथे तालुक्यातील सर्व धान खरीदी केंद्र संचालकांच्या झालेल्या सर्वसाधारण बैठकीत तालुकास्तरीय आधारभूत धान खरेदी संंघाची स्थापना करीत संघाच्या अध्यक्षपदी हैशोक शरणागत यांची निवड करण्यात आली.ही बैठक सभापती रितेशभाऊ वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली ठाकचंद मुंगुसमारे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.या बैठकीत तालुका उपाध्यक्ष प्रभाकर बारई, नरेंद्र पिकलमुंडे,सचिव महादेव बुरडे,सहसचीव जगदीश पंचभाई,कोषाध्यक्ष आकाश गायधने तर सदस्यपदी सुभाष गायधने,भगवान चांदेवार,पिंटू माधव बांते ,चंद्रशेखर हटवार,भोजराम पारधी,भोजराम भर्रे, बालचंद दमाहे,रिताताई हलमारे,श्रीधर गिरिपुंजे,संध्याताई गभने,राकेश कारेमोरे,महादेव पचघरे,महेश तुपट यांची निवड करण्यात आली.सभेला ग्रेडर मोहतुरे,कानेटक,ठाकरे,हरगुडे व सर्व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.