गंगाबाई महिला रूग्णालयातून नवजात मुलं पळविणारा अटकेत

0
9

गोंदिया- येथील गंगाबाई महिला रूग्णालयातून प्रसुता आई व त्यांच्या नातेवाईकांची नजर चूकवून दोन दिवसापूर्वी जन्माला आलेली मुलगी ला पळवून नेणा-या एकाला रूग्णालयात उपस्थित असलेल्या नातेवाईकांचे  लगेच लक्ष गेल्याने गंगाबाई रूग्णालयातील मुख्य द्वारातून पळ काढण्यापूर्वीच त्या मुल चोरून पळणा-याला पकडले. व त्यांला गोंदिया शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना आज गुरूवार ला सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली असल्याने रूग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली.

तसेIMG-20160421-WA0028[1]च प्रसुता मातांना आता रूग्णालयात अधिकची काळजी घेवून आपल्या नवजात मुलं ची रक्षा स्वतःच करण्याची नामुष्की रूग्णालय प्रशासनाच्या सुरक्षेविषयी दिरंगाई मुळे ओढवली आहे. मिळालेल्या माहिती  नुसार मंगळवार 19 एप्रिल ला सालेकसा तालुक्यातील दागोटोला-सातगाव निवासी भूमिता संतोष थोटे या महिलेला शस्त्रक्रिये ने मुलीला जन्म दिला. शस्त्रक्रिया झाली असल्यामुळे या महिलेला सात दिवस रूग्णालयात उपचार घेणे आवश्यक असल्यामुळे तिला रूग्णालयातील वार्ड क्रमांक 2 मध्ये दाखल करण्यात आले. आज सकाळी भूमिता आपल्या वहिनी सुलोचना मेंढे हिच्यासोबत कपडे बदलण्याकरिता रूममध्ये गेली असता दरम्यान  एका तरूणाने त्यांच्या दोन दिवसाच्या मुलीला घेवून रूग्णालयाबाहेर पळ काढत असतांना तिथे हजर असलेले सालेकसा निवासी होमगार्डमध्ये असलेला युवक उमेश माहुलेसह सामाजिक कार्यकर्ते आनंद मेश्राम व तेथील काही नागरिकांनी लगेच धाव घेऊन त्याला पकडले.. व त्याला शहर पोलिस ठाण्यातील पोलिस बोलावून त्यांच्या ताब्यात दिले. मुल पळविणारा तरूण हा कानडी भाषेचा प्रयोग जास्त करीत असून तो बाहेर प्रांतातील असावा असा अंदाज आहे. त्याचे नाव विचारले असता त्याने विजय देवर वय 26 वर्ष रा. बी.एम.सी. काॅलोनी असे सांगितले.

दरम्यान गोंदिया येथील गंगाबाई रूग्णालयातून मुलं पळविण्याची ही पहिली घटना नसून यापूर्वी ही असे प्रयत्न झालेे असून सुद्धा रूग्णालय प्रशासनाने या संदर्भात कधी ही काळजी घेतली नसल्याचेच लक्षात येते. नुकतेच येथील रक्तपेढीतील भोंगळ कारभार  उघडकीस आले होते. व आता हे मुलं चोरीचे प्रयत्न घडल्यामुळे येथील रूग्णांना कधी तरी सर्व काही आलबेल मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मुलं चोरीचे प्रयत्न करणा-याला पोलिस ताब्यात घेतले असून वृत्त लिहेपर्यंत फिर्यादी मातेकडून वा त्यांच्या नातेवाईकांकडून तक्रार आली नसल्यामुळे  शहर पोलिसांत या संदर्भात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.

रूग्णालयातील पोलिस चौकीत पोलिस गैरहजर असल्यामुळे घडली घटना

या संदर्भात गंगाबाई रूग्णालयातील वैद्यकिय अधिक्षक ना विचारणा केली असता त्यांनी वाॅर्ड क्रमांक दोन मध्ये माता-बाळ व एक नातेवाईकांना सोबत राहण्याची मुभा आहे. व त्या वाॅर्डात इतर कुणाला प्रवेश नसतो मात्र घटनेपूर्वी माता ही आपले कपडे बदण्याकरिता सोबत असलेल्या महिलेसोबत गेली असताक्षणी सफाई करणा-यांनी द्वार उघडे ठेवले असता कुणी तर पाळत ठेवणा-यांनी सदर घटना घडवून आणली असल्याचे तसेच गंगाबाई रूग्णालय परिसरात असलेल्या पोलिस चैकीत त्याक्षणी पोलिस कर्तव्यांवर हजर नसल्यामुळे सदर घटना घडली असल्याचे ‘मटा’ शी बोलतांना सांगितले. तेथील उपस्थितांनी सांगितले की गेल्या अनेक दिवसापासून पोलीस चौकीत कुणीच नसते.राहिले तर रात्रीला सक्षम असे शिपाई दिले जात नसल्याचीही चर्चा होती.

 

सीसीटीव्ही कॅमरेत रेकाडिगंच नाही

बीजीडब्लू रुग्णालयातील प्रत्येक वाॅर्डात आणि कक्षात तसेच परिसरात लाखो रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.परंतु गेल्या आठदिवसापुर्वी बंद असलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्यात आले असले तरी त्यात रेकाडी्रंगच होत नसल्याचे आजच्या प्रकरणावरुन उघडकीस पडले.यावरुन फक्त सीसीटीव्ही कॅमरे देखाव्यासाठी असून देखभाल दुरुस्तीच्या नावावर लुबाडणूक तर होत नाही ना अशा शंकाना रुग्णालयातीलय कर्मचारी वर्गात चर्चा होती.