२४ एप्रिल रोजी शिल्पकार बुद्ध-भीमगीतांचा कार्यक्रम

0
9

गोंदिया,दि.२१ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. दूत समतेचा जागर महामानवाचा अंतर्गत प्रसिद्ध पार्श्वगायक प्रा.डॉ.अनिल खोब्रागडे यांचा शिल्पकार हा बुद्ध-भिम गीतांचा कार्यक्रम २४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता भीमनगर ग्राऊंड गोंदिया येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री राजकुमार बडोले हे करतील. अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे हे असतील. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, खासदार सर्वश्री प्रफुल पटेल, नाना पटोले, अशोक नेते, आमदार सर्वश्री राजेंद्र जैन, प्रा.अनिल सोले, नागो गाणार, गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, नगराध्यक्ष कशिश जायसवाल, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, समाज कल्याण समिती सभापती देवराम वडगाये यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी केले आहे.