विद्युतीकरण बळकटीकरणासाठी 1590.76 कोटीच्या आठ योजना प्रस्तावित – ऊर्जामंत्री

0
6

नागपूर : नागपूर शहरासह जिल्ह्यातील विद्युतीकरण बळकट करण्यासाठी 1590.76 कोटींच्या आठ योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून ही कामे लवकरच सुरु होणार आहेत. तसे पायाभूत आराखडा-1 ची 92 टक्के कामे पूर्ण झाली असून पायाभूत आराखडा-2 ची 38 टक्के कामे झाली असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात ही बैठक झाली. बैठकीला जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, आशिष देशमुख, अनिल सोले, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, नागो गाणार, जोगेंद्र कवाडे उपस्थित होते.

पायाभूत आराखडा-1 मध्ये 456 कोटींपैकी 421 कोटींची कामे झाली आहेत. 33 व 17 केव्हीची 17 उपकेंद्र तयार करण्यात आली. 33 व 11 केव्हीच्या नवीन उपकेंद्रांमध्ये 22 ठिकाणी अतिरिक्त रोहित्र लावण्यात आली. 1654 किमीच्या नवीन उच्चदाब वाहिन्या टाकण्यात आल्या. 252 किमीच्या लघुदाब वाहिन्या टाकण्यात आल्या. 1859 नवीन रोहित्रे लावण्यात आली आहेत. 402 एचव्हीडीएस रोहित्रे लावण्यात आली.