बलात्कार पिडीत तरूणीला रुग्णवाहिका नाकारली

0
19

रुग्णवाहिका नसल्याचे कारण : तीन दिवस काढले बेशुद्धावस्थेत; नर्स पेपरवर नोंदही नाही

गोंदिया,- : नवेगावबांध पोलिस ठाणेंतर्गत परसोडी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. तिची प्रकृती अत्यवस्थ होती. गोंदिया येथील बाई गंगाबाई रुग्णालयातील डॉक्टरांनी सोमवारी(ता.१८) नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. परंतु, रुग्णालयात रुग्णवाहिका आणि चालक उपलब्ध नसल्याच्या कारणावरून त्या पिडीत मुलीला नागपूरला पाठविण्यात आले नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली. १९ तारखेपासून नर्स पेपरवर कुणाचीही नोंद नाही.त्यामुळे हे रुग्णालय रुग्णांना यमसदनी पाठविण्यसाठीच की काय अशी अवस्था झाली आहे.विशेष म्हणजे या रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ.संजिव दोडके स्वतला कार्यतत्पर समजतात परंतु त्यांचेही याकडे लक्ष नसल्याने असे अधिकारी जर या रुग्णालयात असतील तर त्यांच्या हाताखालचे वैद्यकिय अधिकारी रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी कसे वागत असतील याबद्ल न बोललेच बरे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बाई गंगाबाई रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांकडे हेळसांड केल्याच्या प्रकरणावरून उजेडात आले आहे. हे रुग्णालय जिल्ह्यातील महिलांकरिता एकमेव रुग्णालय आहे. गोंदियासह मध्यप्रदेश, छत्तीसड येथील महिला प्रसुतीकरिता येतात. मात्र, येथील अधिकाèयांचे नियंत्रण सुटल्यामुळे रुग्ण वाèयावर आहेत. परिणामी रुग्णांनी खासगी रुग्णालयांकडे धाव घेणे सुरू केले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसोडी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १८ एप्रील रोजी आरोपीने अत्याचार केला. त्यामुळे मुलीची प्रकृती अत्यवस्थ झाली. तिच्यावर पोलिसांनी नवेगावबांध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. प्रकृती जास्त गंभीर असल्याने तिला गोंदिया येथील बाई गंगाबाई रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्याच दिवशी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पिडीत मुलीला गंगाबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तस्त्राव झाल्याने तिच्या शरिरात फक्त ३ ग्रॅम रक्त शिल्लक होते. प्राथमिक औषधोपचारानंतर त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा सल्ला दिला. परंतु, रुग्णालयात रुग्णवाहिका आणि वाहिकेचा चालक उपलब्ध नसल्याने पिडीत मुलीला गंगाबाई रुग्णालयातच ठेवण्यात आले. आजतागायत ती मुलगी गंगाबाई रुग्णालयात आहे. उल्लेखनीय म्हणजे तिची प्रकृती अत्यंत नाजूक असताना देखील १९ तारखेपासून २१ तारखेपर्यंत नर्स पेपरवर कुणाचीही स्वाक्षरी नाही. त्यामुळे हे रुग्णालय रुग्णांचा जीव वाचविण्याकरिता, की यमसदनी पाठविण्याकरिता असा प्रश्न उपस्थित झाला. रुग्णालय प्रशासनाच्या या दुर्लक्षित धोरणामुळे त्या मुलीचा जीव गेला असता, तर जबाबदारी कुणी घेतली असती असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुलगी शुद्धीवर आल्यानंतर आज(ता.२१) नवेगावबांध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री राठोड यांनी गंगाबाई रुग्णालयात येवून तिची जबानी नोंदविली. जिल्ह्यातील एकमेव रुग्णालय प्रशासनाविना चालतो, की काय असा सवाल रुग्णांचे नातलग विचारू लागलेत.