तब्बल 27 वर्षानंतर झाशीनगर उपसा सिंचनचे पाणी पोचले नवेगाव जलाशयात

0
17

अर्जुनी मोर. :– तालुक्यातील शेतक-यांसाठी वरदान ठरणा-या ईटियाडोह धरणावर तयार करण्यात आलेल्या झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी तब्बल 27 वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर नवेगावबांध जलाशयात 29 मे रोजी पडले.
झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी नवेगावबांध जलाशयात पडावे म्हणुन 27 वर्ष प्रतिक्षा करावी लागली.तत्कालीन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या काळात ही योजना सुरु व्हावी म्हणुन बरेच प्रयत्न केले. व मोठ्या प्रमाणात निधी ची सुध्दा व्यवस्था केली होती. मात्र काम करणारी यंत्रणा यांचे कासवगतीने हे काम पूर्णत्वास जाण्यासाठी फार उशिर झाला.ही योजना तात्काळ सुरु व्हावी व नवेगावबांध जलाशयात पाणी पडावे म्हणुन नवेगावबांध क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांनी सतत पाठपुरावा केला.एवढेच नव्हे तर यासाठी जिल्हास्तरीय समितीसुध्दा गठीत केली होती.अखेर रचनाताई गहाणे यांचे पाठपुराव्याला यश येवुन 29 मे रोजी झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी नवेगावबांध जलाशयात सोडण्यात आले. विकी अडो जलाशयातील पाणी नवेगाव बांध जलाशयात सोडण्यासाठी सोमवारी चाचणी घेण्यात आली नवेगाव बाल पूरक कालवा योजनेअंतर्गत नवेगाव बांध तलावाच्या लाभ क्षेत्रातील 900 हेक्टर क्षेत्र तसेच नवेगाव तलावाच्या डोंगरगाव विक्री के अंतर्गत असलेल्या डाव्या बाजूचे 650 हेक्टर असिंचित क्षेत्र असे एकूण 1550 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी झाशीनगर उपसा सिंचन योजनेअंतर्गत धरणातून 17.659 द सघमी पाणी उपसा करून त्याचा विसर्ग 1.15 क्यूसेक झासीनगर योजनेचा मुख्य कालवा सा.क्र.3030 मिटरवरुन एक पुरक कालवा नवेगावबांध जलाशयात सोडण्यात आला आहे. 650 हेक्टरसाठी नवीन डोंगरगाव वितरिका व 900 हेक्टरसाठी जुन्या लघु कालव्याचे नुतनीकरण प्र.मा.मधे अंतर्भूत आहे.या कामास प्रशासकिय मान्यता प्राप्त आहे.तसेच सुधारीत 3051.377 लक्ष मान्यता प्राप्त आहे.या योजनेचे काम सन 2005 -2006 ला सुरु झाले आहे. या योजनेवर आतापर्यंत 2246.92 लाख रुपये खर्च झाला आहे. या योजनेंतर्गत पुरक कालव्याचे काम पुर्ण झाले आहे. नविन डोंगरगाव वितरिका कि.मी.2 ते 7.35 मिटरचे काम पुर्ण झाले आहे. कि.मी.0ते 2 चे काम प्रगतीपथावर आहे. लघु कालव्याचे नुतनीकरण करुन लाभक्षेत्रातील 900 हेक्टर सिंचन क्षेत्र वाढविण्याचे काम पुर्ण झाले आहे. डोंगरगाव वितरिकेवरील चार लघु कालव्याचे संकलन प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.या प्रकल्पासाठी यावर्षी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे.

या प्रकल्पाचा फायदा नवेगाव बांध क्षेत्रातील 27 गावे व डोंगरगाव कवठा बोडदे खैरी या गावांना प्रत्यक्ष फायदा होणार आहे. सोमवारी या प्रकल्पाची चाचणी घेऊन नवेगावबांध जलाशयात पाणी सोडण्यात आल्याची माहिती नवेगाव बांध पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता समीर बनसोडे यांनी दिली.29 मे 2023 रोजी सदर प्रकल्पाची चाचणी घेऊन नवेगाव बांध जलाशयात पाणी सोडण्यात आले. यावेळी नवेगाव बांध क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे तसेच उपविभागीय अभियंता समीर बनसोडे पाटबंधारे मध्यम प्रकल्प उपविभाग देवरीचे उपविभागीय अभियंता श्री हिंगे उपस्थित होते.

झाशीनगर उपसा सिंचन योजना ही 27 वर्षापासून सुरू आहे.भाजपाचे तत्कालीन मंत्री महादेवराव शिवणकर यांनी सन 1996 मधे झाशीनगर उपसा सिंचन योजना अर्जुनी मोर. तालुक्यात खेचुन आणली होती.तेव्हा या प्रकल्पाची किंमत 45 कोटी होती. हा प्रकल्प सन 2007 ला पुर्ण करण्याचे नियोजन होते.आता ही 45 कोटीची योजना तब्बल 168 कोटींवर पोहचली आहे.ही योजना दोन टप्प्यांमध्ये करायची आहे.पहील्या टप्प्यांमधील काही कामे अपुरी आहेत.त्या अटीशर्ती पुर्ततेसाठी आपले प्रयत्न सुरु असुन येत्या दोन तिन महिण्यात पहीला टप्पा ही सुरु करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरु आहे.
रचनाताई गहाणे जिल्हा परिषद सदस्या नवेगावबांध क्षेत्र