पाच पोलीस निलंबित

0
7

गोंदिया : राष्ट्रवादी कांग्रेसचे नगरसेवक व माजी उपाध्यक्षपंकज यादव यांच्यावर १५ एप्रिल रात्री ८.३५ वाजता प्राणघातक हल्ला करण्यात आला. पंकज यादववर निगराणी ठेवण्यात आलेल्या पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा ठपका ठेवत पाच पोलीसांना पोलीस अधिक्षकांनी बुधवार (दि.२0) रोजी निलंबित केले आहे.
१३ जून २0१५ रोजी शहराच्या तहसील कार्यालय समोरील आंबेडकर पुतळ्याजवळ सफाई कामगारांचा नेता छेदीलाल इमलाह यांचा गोळी मारून खून करण्यात आला. त्या खूनाच्या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आले होते. त्याच हत्याकांडात आरोपी म्हणून पोलीसांनी पंकज यादवला अटक करण्यात आली होती. पाच पोलिसांची ड्युटी लावण्यात आली होती. त्यात कमांडर म्हणून हवालदार इंदल आडे (बक्कल नंबर ४८५), नायक पोलिस शिपाई धीरज दिक्षीत (बक्कल नंबर ८६0), पोलिस शिपाई दुर्योधन मारबते (बक्कल नंबर १७८), नायक पोलिस शिपाई जागेश्‍वर उईके (बक्कल नंबर ११२0), महेश तांडेकर (बक्कल नंबर २११७) यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
परंतु या सर्वांच्या उदासिनतेमुळे पंकज यादववर हल्ला झाल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले. निलंबन काळात त्यांना देवरीच्या पोलीस उपमुख्यालयात जोडण्यात आले.