आमदाराच्या दत्तक गावची शाळा डिजिटल

0
14

गोंदिया : आमदार राजेंद्र जैन यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या डव्वा या गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा लोकवर्गणीतून डिजिटल करण्यात आली. शाळा डिजिटल आणि आरोग्य शिविर असे संयुक्त कार्यक्रम ग्रामपंचायत, शाळा व आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
उद््घाटन आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, खंडविकास अधिकारी डी.जी. टेंभरे उपस्थित होते.
डव्वा येथील गावकर्‍यांनी व ग्रामपंचायतीने गावातून लोकवर्गणी करुन शाळा डिजिटल करण्याचा निर्णय केला. त्यानुसार लोकवर्गणी करुन शाळा डिजिटल करण्यात आली.
शाळा डिजिटल कार्यक्रमाचे औचित्य साधून सोबतच आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिविर व कृषी ग्रामसभा आणि समाधान शिबिर असे विविध कार्यक्रमाचे डव्वा येथे बुधवारी २0 एप्रिलला आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमांचे उद््घाटन आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे होत्या. तर अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे, शिक्षणाधिकारी उल्साह नरड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कळमकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, माजी जि.प. सदस्य रूपविलास कुरसुंगे, किरण गावराने, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मुन्ना अग्रवाल, गोंदिया औषध विक्रेता संघाचे अध्यक्षउत्कल शर्मा आणि सचिव सुशील शर्माव तालुक्याचे अध्यक्षप्रमोद गिर्‍हेपुंजे, श्याम येवले, अनिल बिरीया उपस्थित होते.
या वेळी आमदार राजेंद्र जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, शिक्षणाधिकारी उल्हास निवड, शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. सरपंच शारदा किरसान, उपसरपंच मंदा चौधरी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षप्रमोद कुरसुंगे, ग्रा.पं.सदस्य पुष्पमाला बडोले, शालिन्द्र कापगते, विलास चव्हाण, डॉ. सोहन चौधरी, चेतन वडगाये, गोमाजी चौधरी, नारायण प्रधान, डोमा चौधरी, शिक्षक लंजे, नागपुरे, चौधरी, कापगते, मुख्याध्यापक उईके, डव्वा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. बोडोलेकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी कार्यक्रमासाठी सहकार्यकेले.
कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी पेशेट्टीवार, डव्वा आदर्श गाव प्रभारी पंचायत समिती कृषी अधिकारी कापगते, कृषी पर्यवेक्षक धांडे, पंचभाई याशिवाय तालुकास्तरीय सर्वअधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख रहांगडाले यांनी मांडले. संचालन सहायक शिक्षक नागपुरे यांनी केले. आभार सहायक शिक्षिका खुणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व गावकरी बांधव, शिक्षकवृंद, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व शिक्षकेतरांनी सहकार्य केले.