VocalForLocal मोहिमेला साथ देण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांचे आवाहन

0
7

गोंदिया : महिला आर्थिक विकास महामंडळ  व ग्रामउन्नती लोकसंचालीत साधन केंद्र सरांडी तिरोडा महिला बचत गट तर्फे Bright LED लाइट्स असेम्बल कार्य करण्यात येत असून स्वयंरोजगार निर्मिती कडे नवे पाऊल त्यांनी टाकले आहे. गरीब व भूमिहीन महिलांना सक्षम करण्यासाठी Bright LED लाइट्स असेम्बल करण्याचे प्रशिक्षण देखील बचत गटातर्फे देण्यात येत आहे असून गटाच्या महिलांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांना LED लाइट्स असेम्बल चे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावर पंकज रहांगडाले यांनी जिल्हा परिषदे मार्फत मदत तसेच ग्रामपंचायत अंतर्गत पथदिव्यांमध्ये Bright LED लाइट्स वापरण्याबाबत सूचना देणार असल्याचे आश्वासन दिले. सोबतच नागरिकांनी देखील घरघुती वापरासाठी महिला बचत गटाशी संपर्क साधून Bright LED लाइट्स खरेदी करून महिला बचत गटास हातभार लावून महिला बचत गट व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या #VocalForLocal मोहिमेला साथ देण्याचे आवाहन केले आहे.