चुकीच्या आकडेवारीमुळे जिल्हा लाभापासून वंचित राहू नये

0
7

भंडारा: खरीप हंगामपुर्व नियोजन आढावा बैठकीत सादर करण्यात आलेल्या नियोजन अहवालात अनेक त्रृटया आहेत.यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर चुकीची माहिती जावू शकते. तसेच चुकीचे आकडेवारीमुळे जिल्हा लाभापासून वंचित राहता कामा नये. यासाठी जलसंपदा विभाग, जिल्हापरिषद लघुपाटबंधारे, जिल्हा उपनिबंधक आणि कृषि विभागांनी समन्वयाने अहवाल दोन दिवसात सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. दीपक सांवत यांनी दिले.
जिल्हा परिषद सभागृहात आयोजित हंगाम २0१६ च्या पुर्व नियोजन आढावा बैठकीत डॉ. सावंत बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, खासदार नाना पटोले, आमदार अँड. रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, चरण वाघमारे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर,पोलीस अधीक्षक विनीता साहू उपस्थित होते.
खरीप हंगाम पुर्व नियोजन बैठकीत अचुक आकडेवारी सादर न केल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केल्यामुळे पुढील बैठक मंगळवारी मुंबई येथे घेण्याचा निर्णय झाला. बैठकीला अचूक आकडेवारीसह नियोजनबध्द अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्यात.जिल्हयातील किती शेतकर्‍यांना सावकारी कजार्तून मुक्तता मिळाली आणि ज्या सावकारांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली अशा किती सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात केले. याबाबत सदस्यांनी माहिती विचारली.
यावर ७ हजार २८४ प्रकरणांना जिल्हा समितीने मान्यता दिली आणि ५ हजार ४६३ शेतकर्‍यांचे सोने सावकाराने परत केले. तसेच उर्वरित प्रकरणावर कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक यांनी दिली. यावर तुमसर तालुक्यातील सावकारांकडून कर्ज घेतलेल्या किती शेतकर्‍यांची फसवणूक सावकारांनी केली. आणि कितीवर गुन्हा दाखल केला याचा सविस्तर अहवाल संबंधित आमदार आणि मला सादर करावा, अशा सूचना केल्यात. प्रत्यक्षात होणारे सिंचनाची खरी आकडेवारी समोर न आल्यामुळे नुकसानीची बाब नाना पटोले यांनी निदर्शनास आणली.