बीजीडब्लू रुग्णालय; आयुष विभागाच्या शासकीय पुस्तकातून धार्मिक प्रचार

0
14

गोंदिया-आपला देश धर्मनिरपेक्ष देश असून संसदीय लोकशाही प्रणालीला महत्त्व दिले गेले आहे.परंतु गेल्या काही दिवसापासून शासनाच्या प्रत्येक विभागात धार्मिक प्रभावाचा शिरकाव होताना दिसून येत आहे.कुठल्या एका विशिष्ट धर्माचा प्रचार शासकीय पुस्तिकेच्या माध्यमातून करणे म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर कुठेतरी गदा आणणारा आहे.प्रत्येक धर्म हा प्रत्येकजण आपल्या पद्धतीने स्वीकारून त्याचे पालन करीत असताना शासकीय यंत्रणेने त्याचा प्रचार करावा आणि त्यासाठी पुस्तिका तयार करावी हे मात्र पचनी पडणारे नाही.परंतु असा प्रकार गोंदिया जिल्ह्यातीलच शासकीय बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात घडला आहे.या रुग्णालयात कार्यरत असलेल्या आयुष विभागांतर्गत गर्भसंस्कार माहिती पत्रक अशी पुस्तिका तयार करण्यात आली आहे.त्या पुस्तिकेच्या प्रथम पृष्ठावर मासानुमासीक गर्भीणी परिचर्या आहार व उपचार असे लिहिले असून डॉ.गायत्री धाबेकर आयुवैदिक वैद्यकीय अधिकारी यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे.रुग्णालयात येणारी महिला ही एकाच धर्माची असू शकते असे नाही.आणि आयुर्वेदिक उपचार घेणारी महिला सुद्धा कुठल्याही धर्माची असू शकते परंतु त्या महिलेला आपल्या एका पुस्तिकेच्या माध्यमातून या मंत्राचा वापर केल्याने असे होते qकवा हा यज्ञ केल्याने शांती मिळते असे पुस्तकातून सांगणे योग्य वाटत नाही.त्यातही ही पुस्तिका कुठल्या qप्रqटग प्रेस मध्ये छापण्यात आली.पुस्तिकेचे प्रकाशक,मुद्रक ,मालक कोण आहेत.या पुस्तिकेच्या छपाईसाठी कधी निविदा मागविण्यात आली होती,याचा कुठेच उल्लेख नाही.या पुस्तिकेमध्ये विशेष करून ओंकार जप करणे,अग्निहोत्र मंत्राचे श्रवण करणे,गायत्री मंत्राचा जप करणे,विशेष संस्कारामध्ये गायत्री यज्ञ करणे,गणपते नम हा गणेश मंत्र जपणे,ज्ञानेश्वरी पठण करणे आदीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे.परंतु शासनाची कुठल्याही योजनेची पुस्तिका असो की जाहिरात त्यात एका विशेष धर्मातील बाबींचा उल्लेख करताच येत नाही.परंतु गोंदियाच्या बाई गंगाबाई रुग्णालयातील आयुष विभागाने पुस्तिका तयार करताना हा प्रकार का केला यावर ज्यांच्या हाती पुस्तिका लागली त्यांच्यात चर्चा होऊ लागली आहे.

गर्भवती स्त्रीला माहितीसाठी म्हणून आहे,धर्माचा प्रचार नव्हे-डॉ.गायत्री धाबेकर
या पुस्तिकेसंदर्भात आयुष विभागाच्या प्रमुख डॉ.गायत्री धाबेकर यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी बाई गंगाबाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके यांच्याच मार्गदर्शनात ३ हजार पुस्तके छापण्यात आली.त्यांनीच मला ही माहिती छान असल्याचे सांगत प्रकाशनाला मंजुरी दिली.परंतु आम्ही कुठल्याही एका विशेष धर्माचा प्रचार नव्हे तर शास्त्रात उल्लेख असल्याने त्या गोष्टीचा उल्लेख पुस्तिकेत करू गर्भवती महिलेला माहिती व्हावी यासाठी प्रकाशित केल्याचे सांगितले.

आयुर्वेदावर बँड करायचे का-डॉ.सqजव दोडके
बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके यांना या पुस्तिकेसंदर्भात विचारणा करण्यात आली असता त्यांनी मात्र पुस्तिकेचे समर्थन करीत आयुर्वेदाला महत्त्व आहे.त्यामुळे चुकीचे काहीच झालेले नाही.ज्यांना वाटते त्यांनी त्याचा वापर करावे कुणाला जोरजबरदस्ती नाही.मात्र विशिष्ट असा कुठल्याही धर्माचा प्रचार म्हणून ती पुस्तिका नाही आयुर्वेदानुसार असल्याने आम्हाला मात्र काही चूक वाटत नसल्याचे म्हणाले.