नाट्य सभागृहाला छत्रपती शिवाजी यांचे नाव द्या

0
9

गोंदिया : नगर परिषदेच्या रेलटोली येथील जागेवर नवनिर्मित नाट्य सभागृहाला ‘राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील विविध सामाजिक क्षेत्रातील व इतर संघटनांशी जुडलेल्या नागरिकांनी केली आहे. त्याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदनही देण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या नावाला कुणाचाही विरोध नाही. त्यामुळे नाट्य सभागृहाला त्यांचे नाव देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मागणी कर्त्यांमध्ये शिव छत्रपती मराठा समाज गोंदिया, मराठा सेवा संघ गोंदिया, मनसे गोंदिया, शिवप्रतिष्ठानचे जिल्हा संयोजक दुर्गेश रहांगडाले, हर्षल पवार, सोनू चंद्रवंशी, भगवती अग्रवाल, विहिंपचे प्रतिक कदम, बजरंग दलचे महेंद्र देशमुख, देवेश मिश्रा, आधार महिला शक्ती संघटनेच्या जिल्हा संयोजिका भावना कदम, युवा मोर्चाचे अध्यक्ष पंकज रहांगडाले, जागृती सेवा संस्थेचे संस्थापक गजानन डोये, संत गाडगे महाराज स्मारक समितीचे राजेश कनोजिया आदी अनेक संघटना व पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.