आमदार पुराम यांच्या वाहनाला अपघात

0
25
गोंदिया-जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा मतदार क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय पुराम यांच्या गाडीचा शुक्रवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही, आमदार  पुराम यांच्या पायाला दुखापत झाली असून किरकोळ मार लागलेला आहे.

भारत रत्न डॉ.gondiaaccident बाबासाहेब आंबेडकर याच्या १२५ जयंतीचे औचित्य साधून सामजिक न्याय विभागाच्या वतीने अर्जुनी मोरगाव येथे आयोजित बाबासाहेबांच्या जीवन चारित्र्यावर आधारित ‘राजगृहाची निळी संप्दने’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून परत येत असताना सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा-चिखली गावानजीकच्या वळणरस्त्यावर एका दुचाकी स्वाराने पुराम यांच्या गाडीला धडक दिली.यात वाहनचालकाचे संतुलन बिघडल्याने टाटा सफारी हे वाहन रस्त्याच्या कडेला उतरून झाडाला धडक दिली यात वाहनाचे मोठे नुकसान झाले.सुदैवाने यात दुचाकी स्वार बचावाला.परंतु आमदारांची टाटा सफारी गाडीचे नुकसान झाले. चालक आणि पुराम यांच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सुट्टी देण्यात आली असून डॉक्टरांनी दिलेल्या माहिती प्रमाणे संजय पुराम यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.