तिरोडा वेगळ्या विदर्भाची मागणी

0
11

तिरोडा : शहराच्या मध्यवर्ती भागातील हुतात्मा स्मारकाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार करणारे तसेच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित आले. तसेच महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वेगळ्या विदर्भाचा झेंडा पकडून ‘जय विदर्भ’, ‘वेगळा विदर्भ-झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत वेगळ्या विदर्भाचा झेंडा पकडला.
या वेळी प्रामुख्याने विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ पारधी, श्यामराव झरारिया, सुरेश धुर्वे, डी.आर. गिरीपुंजे, न.प. उपाध्यक्ष ममता आनंद बैस, मंदाकिनी गाढवे, योगिता घोडमारे, कोषाध्यक्ष प्रकाश अरोरा, उपाध्यक्ष डॉ.एम.डी. पटले, युवा आघाडी अध्यक्ष रितेश तिवारी, शहर उपाध्यक्ष संजय मेश्राम, गौरव झरारिया, शहर सचिव मनीष तुरकाने, राधेश्याम नागपुरे, महिला आघाडी अध्यक्ष अँड. माधुरी रहांगडाले उपस्थित होते.
विदर्भ राज्य झाल्यास आपणास कोणकोणते फायदे होतील, यावर श्यामराव झरारिया यांनी मार्गदर्शन केले. तर वक्त्यांनी विदर्भ राज्य झाल्यास नोकर्‍यातील फायदे व इतर फायदे यावर प्रकाश टाकला.
संचालन अँड. माधुरी रहांगडाले यांनी केले. प्रास्ताविक रितेश् तिवारी यांनी मांडले. आभार मंदाकिनी गाढवे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.