विषयतज्ज्ञांची स्वजिल्ह्यातच नोकरीची मागणी

0
12

गोंदिया : जिल्ह्यातील १0६ रिक्त विषयतज्ज्ञांच्या जागा कंत्राटी पध्दतीने जिल्हा परिषदेने २00६ मध्ये भरल्या. त्यांतील ३0 विषयतज्ज्ञांचे ९00किमीवर मराठवाडा विभागातील नांदेड येथे समायोजन करण्यात आले. कुटुंब गोंदियात आणि नोकरी नांदेडमध्ये अशी त्यांची अवस्था आहे. कायम नका करू, निदान स्वजिल्ह्यात बदली द्या, अशी विनवणी विषयतज्ज्ञांच्या कुटुंबीयांनी केली आहे.शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याशी एकदा संघटनेच्या पदाधिकार्‍यांची भेट घालून द्यावी, या मागणीला घेऊन सर्व विषयतज्ज्ञ आपल्या कुटुंबीयासह पालकमंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेवून ते आपले गार्‍हाणे मांडणार आहेत.यावर तोडगा न निघाल्यास पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासमक्ष बेमुदत उपोषणाची तारीखदेखील ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे धनराज चव्हाण, उमेश भांडारकर, योगेश शुक्ला, रानू ठाकूर, कुमारी येळे, कुमारी मेश्राम, अमर चव्हाण यांनी दिली.
जसजसा शिक्षणाच्या कक्षा रूंदावत आहेत, तसतशी नवीन प्रणाली उद्यास येत आहे. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शव व्हावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेने २00६ मध्ये १0६ पदांकरिता जाहिरात काढली.त्यापैकी १0३ जागा कंत्राटी पध्दतीने भरण्यात आल्या. कंत्राटी पध्दतीने घेण्यात आलेल्या कर्मचार्‍यांचे इतर जिल्ह्यात स्थानांतर करण्यात येऊ नये, असा शासनाचा नियम आहे. स्थानांतर करावयाचे झाल्यास नजीकच्या जिल्ह्यात करण्यात यावे, अशी अट आहे.
परंतु महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने गोंदियातील तब्बल ३0 विषयतज्ज्ञांना अतिरिक्त ठरवून मराठवाडा विभागातील नांदेड येथे नियुक्ती दिली. बेरोजगार असल्यामुळे तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी नोकरी असतानादेखील नांदेड येथे ३0मार्च २0१३पासून नोकरीवर आहेत. मात्र, आता वृध्द आईवडिलांची प्रकृती बरोबर राहत नसल्यामुळे आपल्याला गोंदिया जिल्ह्यातच नोकरी देण्यात यावी, अशी मागणी विषयतज्ज्ञांनी केली. यासंबंधाने विषय साधन व्यक्ती बदली समितीची स्थापनादेखील करण्यात आली.
समितीमार्फत अनेकदा मंत्री आणि अधिकार्‍यांची भेट घेतली. परंतु केवळ घोषणांचा पाऊस पडत आहे. कुणालाही या कर्मचार्‍यांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्याचे सोयरसुतक नाही. पंधरा दिवसांपूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक निश्‍चित करण्यात आली.