जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्डात घाणीचा विळखा

0
11

लाईफ लाईन एक्सप्रेसचे बॅनर कोलमडलेIMG-20160504-WA0178

गोंदिया -येथील कुवर तिलकंसिह जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्यादिवसेदिवंस वाढतच चालल्या असून स्वच्छतेकडे जिल्हा शल्यचिकित्सकाचे असलेले दुर्लक्षामूळे रुग्णालय परिसरात उघड्यावर घाण साचण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.एकीकडे बाई गंगाबाई रुग्णालयाच्या स्वच्छतेविषयी तेथील अधिक्षकावर दोषारोपण करणारे येथील जिल्हा शल्य चिकिस्तकांच्याच दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र आज गुरुवारला जिल्हा रुग्णालयात फेरफटका मारले असता दिसून आले.

सध्या सामान्य रुग्णाना मोफत उपचार उपलब्ध होऊन निशुल्क शस्त्रक्रियेसाठी लाईफ लाईन एक्सप्रेस ही गोंदियात दाखल झाली आहे.या लाईफ लाईन एक्सप्रेसच्या माध्यमातून ४ मे पासून रुग्णावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी नोंदणीला प्रारंभ करण्यात आले.पहिल्याच दिवशी आलेल्या रुग्णाना दुपारी ३ वाजेपर्यत तातकडत ठेवण्यात आले.त्यांना चहा नास्ता सुध्दा विचारण्यात आले नाही.तर आज गुरुवारला दुसèया दिवशी आलेल्या नेत्रतपासणीसाठीच्या रुग्णांची सुध्दा तिच अवस्था होती.२०० च्याजवळपास आलेल्यापैकी फक्त ६३ रुग्णांची निवड नेत्रशस्त्रक्रियेसाठी करण्यात आली.सकाळी आपल्या घरुन जे काही नास्ता qकवा जेवण करुन आले त्याशिवाय सायकांळी ४ वाजेपर्यत या रुग्णाना कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ रुग्णालयाकडून दिले नसल्याचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी प्रतिनिधीला सांगितले.सायकांळी दिला जाणारा चहा सुध्दा दिला गेला नव्हता.तर याच लाईप लाईनच्या नावावर काही अधिकारी स्वंघोषित संस्थेच्या लोकांना सोबत घेऊन ग्रंडसिता या थ्रीस्टार हाटेलात मात्र आपल्या जेवणाची सोय करुन बसले होते.

लाईप लाईनच्या नावावर सुध्दा मोठा निधी उपलब्ध झाला असून प्रचार प्रसिध्दीच्या नावावर असलेल्या निधीचा योग्य वापर न केल्याने आजही गावखेड्यात माहिती पोचू शकली नाही.परंतु त्या नावावर पत्रके छापण्याचे काम जिल्हा शल्यचिकित्सकांनी आपल्याला जो काही कमावून देतो त्याचा कसा लाभ होईल याची काळजी घेतलेली नक्की दिसून येते. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या शेजारीच असलेल्या नेत्रविभागाकडे जाणाèया मोकळ्या जागेच्या qभतीवर लाईफ लाईनची माहिती देण्यासाठी लावण्यात आलेले फलक सकाळापासून निघाले होते परंतु त्या रुग्णालयातील कुणाचेही त्याकडे लक्ष गेले नाही,ते सायकांळी ४ वाजेच्या सुमारासही त्याचअवस्थेत होते.तर ज्या भागात ओपीडी आहे,रुग्णांवर प्राथमिक उपचार होते त्या भागातील वèहाड्यांत गायीने घाण करुन ठेवल्याचे स्पष्ट दिसून येत असतानाही स्वच्छता कर्मचारी मात्र डोळेझाक करुन होते.त्यानंतर ओपीडीच्या शेजारील वहांड्यात असलेले बेशीनची अवस्था बघून स्वच्छता काय होत असेल दिसून येते.त्याशेजारीच मोठ्या अक्षरात फलक लावण्यात आलेले आहे.की येथे कचरा टाकू नये परंतु त्या कचरापेठीच्या शेजारीच घाणझालेले व रक्ताचे कपडे खाली पडून होते.वरच्या माळ्यावर जातांनाच रुग्णांच्या माहितीसाठी लावण्यात आलेले फलकही निघून गेले तरी कुणाचे लक्ष नाही.रुग्णासांठी असलेली लिफ्ट सुध्दा अनेक महिन्यापासून बंद पडली आहे.20160505_155803

तर दुसरीकडे मेडीकल कॉलेजच्या भागात असलेली लिफ्ट मात्र सुरु असल्याचे दाखवण्यात आले आहे.नेत्र रुग्ण व स्त्री रुग्ण असलेल्या वार्ड क्रमांक ३ कडे गेल्यास रुग्णांचे नातेवाईक हे वèहांड्याच्या शेजारीच अन्न उघड्यावर टाकत असल्याचे बघावयास मिळाले.ते अन्न दिवसभर तसेच असते परंतु त्याकडे कुठलाही वैद्यकीय अधिकारी किवां सफाई कामगार बघत नसल्याचेही आढळून आले.तर मेडीकल कॉलेजकरीत देण्यात आलेल्या जागेकडे असलेल्या अपघातग्रस्त रुग्णांच्या वार्डातील शौचालयाची वाईट अवस्था असून त्या शौचालयातही अन्न उघड्यावर टाकल्याचे तसेच सततच्या पाणी वाहणाèया नळामूळे शौचालय पुर्णत घाण झाल्याचे चित्र बघावयास मिळते.या जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रत्येक वार्डात घाणीचे साम्राज्य असतानाही जिल्हा शल्यचिकित्सकाचे त्याकडे कानाडोळा आहे.त्यांना याकडे लक्ष द्यायला वेळच नसल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवी धकाते यांना यासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेले असता ते अत्यंत व्यस्त असून भेटू शकत नाही.त्यांच्याकडे गोंदियातील एका संस्थेचे प्रतिनिधीसोबत बैठक सुरु असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया यावर कळू शकली नाही.