कत्तलखान्यात जाणारे दोन ट्रक माने यांच्या सर्तकतेने पोलीसांच्या स्वाधीन

0
12
महेश येळे
रावणवाडी(गोंदिया):-महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवरील रावणवाडी पोलीस ठाण्यातर्गंत  आज दि. ११ मे  रोजी दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान मध्यप्रदेशच्या मार्गाने ट्रकमध्ये गायींना भरुन ते कत्तलखान्याकडे नेत असतांना रावणवाडी येथे मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र माने यांनी रावणवाडी पोलिसांसोबत त्या ट्रकला पक़डले.त्यामुळे 55 – 60 गायींना  कत्तल खान्यात नेण्यापासून वाचविण्यात आले.गायींना कत्तल खान्यात वाहून नेणा-या ट्रक क्र. एमएच ४९-०७८६ चा ड्रायव्हर बबलू शेख (वय ३३ रा. नागपूर), एमएत्र ३१- सीबी ७९९ चा ड्रायव्हर आकाश पाटील (वय २३ रा. कामटी), हे  मध्यप्रदेश मार्गाने रावणवाडी पोलीस ठाण्यासमोरुन गोंदियावरून नागपूरला जात असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र माने यांना मिळाली.त्यांनी लगेच रावणवाडी पोलिसांना कळवून  या दोन्ही ट्रकांना अडविले अाणि तपासणी केली असतांना या ट्रकमध्ये गायींना कोंबूंन नेत असतांना आढळले.ट्रक ताब्यात घेऊन ट्रकचालकांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते.वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कार्यवाही सुरू होती.