घरगुती गॅस कनेक्शनचे वितरण

0
10

तिरोडा:संयुक्त वन व्यवस्थापन समिती, वन हक्क समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्तवतीने ग्राम खर्रा येथे ३३ लाभार्थ्यांना घरगुती गॅस कनेक्शनचे वितरण आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. ३१ डिसेंबर २0१५ रोजी विविध विभागातील अधिकार्‍यांच्या सभेत घरगुती गॅस कनेक्शनचे नियोजन करून ३१२ जणांचा प्रस्ताव वन विभागामार्फत शासनास सादर करण्यात आला होता. त्यातील १0 अनुसूचित जाती व २३ मागास प्रवर्गातील अशा एकूण ३३ लाभार्थींना आमदार यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.