सोंड्याटोला सिंचन प्रकल्प ठरतोय पांढराहत्ती

0
11

भंडारा-सिहोरा-बपेरा परिसरातील महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प राजकीय इच्छाशक्तीअभावी पांढरा हत्ती म्हणून उभा आहे. या प्रकल्पाची समस्या सोडविण्यास लोकप्रतिनिधींचे प्रयत्न अपुरे पडले असून विरोधी पक्षाचेही या कडे दुर्लक्ष आहे.
सिहोरा-बपेरा परिसरातील जवळपास ४८ हजार हेक्टर आर शेतजमीन ओलीताखाली आणण्यासाठी युती शासनाच्या काळात सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आला. आघाडी शासनाच्या काळात हा सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आला. सन २00७ पासून नदीपात्रातून पाण्याचा उपसा सुरू आहे. रब्बी हंगामात डावा कालवा आणि उजवा कालव्याअंतर्गत रोष्टर पध्दतीने ३ हजार हेक्टर आज शेतीला पाणी पुरवठा होत होता. मात्र, मागिल वर्षी वीज बिल थकित असल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
परंतु, शेतकर्‍यांच्या मागणीमुळे थकीत वीज बिल भरून पाण्याचा उपसा करण्यात आला होता. पुन्हा जैसे-थे अशी परिस्थिती या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पावर आल्याने सोंड्याटोला सिंचन प्रकल्प पांढरा हत्ती म्हणून उभा आहे.
दरम्यान मागील सहा महिन्यापासून ११0 कोटी रुपये खर्चाचा महत्वाकांक्षी उपसा सिंचन प्रकल्प पंपगृहाच्या टाकीतील गाळ उपसा करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू करण्यात आली नाही. यावर्षी सिंचन प्रकल्प नदी पात्रातून पाण्याचा उपसा करणार किंवा नाही अशी शंका आता शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.