दोन वर्षांपासून वसतिगृहाचे बांधकाम सुरूच

0
19

तुमसर : आयुष्य संपलेल्या इमारतीत शासकीय मुलींचे वसतिगृह भाड्याने सुरू आहे. आदिवासी विभागातर्फे तुमसर शहरात मुला-मुलींचे वसतिगृहाचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. आदिवासी मंत्रालयाने आतापर्यंत केवळ ३ कोटी ५० लक्षाचा निधी दिला. उर्वरित पाच कोटीच्या निधीची येथे प्रतीक्षा आहे. या वसतीगृह इमारतीच्या बांधकामावर राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्र्यांनी दोनदा भेट दिली हे विशेष.

तुमसर शहरात रेल्वे स्थानकाजवळ मागील दोन वर्षापासून मुलामुलींचे वसतिगृह इमारतीचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. मुले ७५ व मुली ७५ अशी क्षमता या वसतिगृहाची आहे.

नवीन शैक्षणिक सत्रापासून शासनाने मुला-मुलींचे वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण करावे अन्यथा २४ जून रोजी आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह नवीन इमारतीसमोर धरणे, उपोषण, रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी भाजप आदिवासी आघाडीचे अध्यक्ष अशोक उईके, माजी पं.स. सदस्या प्रभा पेंदाम, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, आदिवासी विद्यार्थी संघ, तुमसरचे अध्यक्ष दिनेश मरस्कोल्हे, धनराज इळपाचे, विकास मरस्कोल्हे, नरेंद्र मडावी, हीना मडावी, निकिता सराटे, कैलास गजाम, सुभाष धुर्वे उपस्थित होते