पालकमंत्र्यांनी घेतला आमदार आदर्श ग्राम कनेरीचा आढावा

0
11

सडक अर्जुनी – गावात पिण्याचे शुद्ध पाणी, वृक्षारोपण, विद्याथ्र्यांना ई लर्निंगची अत्याधुनिक सुविधा, वाचनालय, अत्याधुनिक ग्राम पंचायत, महिला व पुरुषांचे स्वयंपूर्ण बचत गटातून आर्थिक विकास, कौशल्य विकासाकरिता प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती आदी महत्वाची कामे करतांना गावकèयांचा सहभाग महत्वाचा आहे. या करिता अधिकारी व कर्मचाèयांनी कनेरी या गावाला आदर्श करण्याकरिता प्रत्येक बाबतीत तांत्रिक दृष्ट्या विचार करून व भविष्याचा वेध घेऊन काम करण्याचे आव्हान पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
ते १३ मे रोजी कनेरी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित आढावा सभेत बोलत होते. या वेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचनाताई गहाणे, पंचायत समिती सभापती कविता रंगारी, सरपंच इंदुताई मेंढे, खंडविकास अधिकारी झामसिंग टेंभरे, उपसरपंच प्रेमराज मेंढे, पंचायत समिती सदस्य राजेश कठाणे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत धमगाये, उपविभागीय अभियंता देशमुख, शाखा अभियंता अगळे, वसंत गहाणे, ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन भेंडारकर, चंद्रकुमार खोटेले, शिशुकला तवाडे, सरिता वैद्य, कोकिळा मेंढे, सचिव सी. जी. बागडे आदि उपस्थित होते.
आढावा घेतांना त्यांनी, गावकèयांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्या याकरीता ग्रामपंचायत इमारत सुसज्ज व्हावी या करीता नाविन्यपूर्ण इमारत बांधकामाचा व आवश्यक सर्व बाबींचा प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात निर्देश दिले. या वेळी बिडीओ टेंभरे यांनी गावात झालेल्या कार्याचा अहवाल सादर केला.सभेचे संचालन व आभार सचिव बागडे यांनी केले.या वेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी गावात तयार शोषखड्ड्यांची पाहणी केली व तांत्रिकदृष्ट्या त्यांचा उपयोग होतोय का याची खात्री करून आगामी कार्याबद्दल अधिकाèयांना निर्देश दिले.