नक्षल चळवळीचा खात्मा करण्यात पोलिसांना यश

0
11

नागपूर,दि.१५-महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक प्रविण दिक्षित गेल्या दोन दिवसापासून गडचिरोलीच्या दौèयावर होते.दौरा आटोपून ते नागपूरात परतल्यावर पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाèयांशी भेटले.नक्षल विशेष पोलीस महानिरिक्षक यांच्यासह इतरांशी चर्चा केली.त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल कारवाया मोठ्याप्रमाणात कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या योग्य पाठींब्यामुळे पोलीस अहोरात्र गडचिरोलीच्या नक्षलभागामध्ये काम करत आहे. गेल्या काही महिन्यात मोठ्या नक्षलवाद्यांना पकडण्यात पोलीसांना यश आले आहे. समाजातील प्रत्येक वर्गाने पोलीसमित्र तयार झाले आहेत ज्यामुळे हे एक मोठे मॉडेल तयार झाले याचा वापर मोठ्याप्रमाणात गुन्हेगारांबदद्ल माहिती मिळू शकते.नागपूर शहरातील घटनावंरही त्यांनी आपले मत मांडले. पोलीस आणि पोलीस मित्र मिळून एक मोठ जाळं तयार होत आहे . चेनस्नॅचिग सारख्या गुन्ह्याच्या प्रकारावर आता कडक शिक्षा देण्याच कॅबीनेट ने मंजूर केले आहे गुन्ह्याचा तपास जलद गतीने होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या पत्रकार परिषदेला नागपूरचे पोलीस आयुक्त एस पी यादव सहपोलीस आयुक्त राजवर्धन नागपूरचे आय जी रविंद्र कदम अतिरिक्त पोलीस आयुक्त एस तरवडे पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा उपस्थित होते