नागपुरातील रक्तपेढ्यांमध्ये ठणठणाट

0
10

नागपूर : दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई जाणवते.याच दिवसांत रक्ताची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे रक्तदात्यांची संख्या कमी झालेली असते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर रक्तासाठी धावपळ करण्याची वेळ येते. याही वर्षी हीच स्थिती आहे. शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये दोन-तीन दिवस पुरेल एवढाच रक्त पिशव्यांचा साठा आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या ठणठणाटामुळे सर्वच रक्तपेढ्यांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे.

उपराजधानित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी अडीचशेवर खासगी रूग्णालये आहेत. यांना रक्तपुरवठा करणाऱ्या चार शासकीयसह नऊ खासगी रक्तपेढ्या आहेत. परंतु सर्वच ठिकाणी जेम-तेम रक्ताचा साठा उपलब्ध आहे.

शहरात दिवसाकाठी साधारण एक हजार रक्तपिशव्यांची मागणी असते. परंतु सध्याच्या दिवसात २००-३०० रक्तपिशव्यांचा पुरवठा होत आहे. रक्त दिलेल्या सर्वच रूग्ण रिप्लेसमेंट रक्त देतील असे नाही.