आश्रमशाळा कर्मचारी संघटनअध्यक्षपदी भोजराज फुंडे

0
10

देवरी : येथील आफताफ मंगल कार्यालयात अनु. आदिवासी कर्मचारी संघटनेच्या गोंदिया-भंडारा जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. अनु. आदिवासी आश्रम शाळेतील शाळा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जुन्याच पदाधिकार्‍यांच्या कार्यावर समाधान व्यक्त करुन व त्यांच्यावर विश्‍वास ठेवून कार्यकारिणीमध्ये काही किरकोळ बदल करुन जुनीच कार्यकारिणी कायम ठेवलेली आहे. भंडारा व देवरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत अनुदानीत आश्रम शाळांतील सुमारे दोनशे ते अडीचशे कर्मचारी उपस्थित झाले होते.
निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी भोजराज एस. फुंडे, उपाध्यक्ष आर.वी. सपाटे, सचिव व्ही.बी. सपाटे, सहसचिव बी.डी. भोयर, कोषाध्यक्ष एस.जे. लंजे, प्रवक्ता जे.पी. खुणे, संघटक आर.ए.मारवाडे, प्रचार आर.एच. मेश्राम, समन्वयक बी.एस. मडावी, सदस्य एस.के. कापगते, ए.ए.हुकरे, डी.आर. तरजुले, एच.एम. नंदेश्‍वर, बी.एम. शिंदे, एच.एस. पटले, ए.के.दमाहे, यु.एस. मेश्राम, महिला आघाडी प्रमुख एस.एम. नागलवाडे, महिला आघाडी उपप्रमुख व्ही.व्ही. कुंभलकर यांचा समावेश आहे.