डेंग्यूला वेळीच नियंत्रित करा -डॉ. गहलोत

0
8

गोंदिया : एका डासापासून होणार डेंग्यू हा आजार वेळीच काळजी न घेतल्यास जीवावर बेततो. त्यामुळे या आजाराची वेळीच रोखधाम करणे गरजेचे असून यासाठी डासांची उत्पत्ती होऊ न देणे हे गरजेचे आहे. करिता डेंग्यूच्या रोकथामासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांनी केले.
जिल्हा आरोग्य प्रशासनाच्यावतीने बुधवारी (दि.१८) जिल्हा परिषद आरोग्य भवन सभागृहात आयोजीत ‘जागतीक डेंग्यू दिन’ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गहलोत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी सहायक जिल्हा हिवताप अधिकारी बींझाडे, साथरोग अधिकारी डॉ. पटले, गुप्ता, बिसेन, आरोग्य विस्तार अधिकारी दिलीप कुंभरे, ठाकुर, शुक्ला वानखेडे व बहुसंख्येत आरोग्य सहायक सहाय्यीका आरोग्य कर्मचारी-अधिकारी हजर होते. संचालन जिल्हा हिवताप कार्यालयाचे किटक समाहरक किशोर भालेराव यांनी केले. आभार आत्माराम वंजारी यांनी मानले.