३८.८६ टक्केच मतदान

0
6

गोंदिया :  शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील पोटनिवडणुकीप्रती मतदारांत निरू त्साह दिसून आला. परिणामी या पोटनिवडणुकीत फक्त ३८.८६ टक्केच मतदान करण्यात आले. उन्हामुळे दिवसा मतदानासाठी मतदार बाहेर निघाले नसल्याचे दिसले. रिंगणात असलेल्या सहा उमेदवारांचे भाग्य अखेर पेटीत बंद झाले.

शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अनिल पांडे यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. यांतर्गत रविवारी (दि.२९) मतदान घेण्यात आले. यासाठी प्रभागातील संत तुकाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात १ ते ४, जेठाभाई माणिकलाल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुख्य शाखेत ५ ते ८, सरस्वती महिला विद्यालयात ९ व १० आणि नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात ११ ते १३ असे एकूण १३ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते.