आयुक्‍त अनुपकुमार यांची पिंपरी, आगरगावला भेट

0
7

वर्धा : नुकत्‍याच झालेल्या पुलगाव येथील घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर पिंपरी आणि आगरगावला बुधवारी विभागीय आयुक्‍त अनुप कुमार यांनी भेट देऊन ग्रामस्‍थांसोबत चर्चा केली. स्‍फोटामुळे घरांचे नुकसान झाले आहे. आवाजामुळे ग्रामस्‍थांना त्रास होऊ नये यासाठी आरोग्‍य तपासणी करण्‍यासाठी विशेष वैद्यकीय कॅम्‍प सुरु करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या. 446 घरांना तडे गेले असून मदतीबाबत तात्‍काळ कार्यवाही करण्‍याच्‍या सुचना विभागीय आयुक्‍तांनी दिल्‍या. यावेळी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, जिल्‍हा परिषेदेचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री.इलमे, गटविकास अधिकारी श्री.शिंदे, तहसिलदार श्रीमती तेजस्विनी जाधव, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी उपस्थित होते. 

आगरगाव 337, पिंपरी 92 आणि नागझरी येथील 17 घरांच्‍या नुकसानी संदर्भात बांधकाम विभाग, महसूल विभाग, ग्रामसेवक यांनी प्रत्‍यक्ष नुकसानीचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्‍याच्‍या सुचना यावेळी विभागीय आयुक्‍त श्री.कुमार यांनी दिल्‍या.