सहा.अभियंता कोकणेला शिविगाळ

0
10

गोंदिया,दि.4-महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, मेन मार्केट वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता  के ए कोकणे यांना आज दि 04 रोजी सकाळी 11:10 वाजता त्यांंच्या कार्यालयात जाऊन नोतनदास वासुमल गोपलानी नामक इसमाने अश्लील शिविगाळ करुन कार्यालयातील कागदपत्रे फेकून शासकिय कामात अडथळा निर्माण केला.या संदर्भा कोकणे यांनी पोलीस स्टेशन गोंदियाला तक्रार दाखल केली असून पोलिसांनी कलम 294,186,506 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.या घटनेचा सबार्डिनेट इंजिनर्यस असो.च्यावतीने निषेध नोंदविण्यात आला आहे.तसेच आरोपीवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी असो.चे पदाधिकारी हरिष डायरे,सुहास धामनकर,राजेश येळे, सरोजसिंह परिहार,सुनिल माहुर्ले,सुमीत पांडे,सुनिल रेवतकर,विनय नेवारे,प्रदिप मोहितकर, अश्विन शहारे,नावेद शेख,शाऱिक खान,समिर कायंदे,प्रशांत वडस्कर,विक्रम काटोले,शैलेश राजू यानी केली आहे.